By  
on  

बिग बॉस मराठी 2: पराग कान्हेरीची हकालपट्टी नाही तर रवानगी होणार इथे....

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात 'टिकेल तोच टिकेल' टास्कदरम्यान परागने नेहा आणि वैशालीवर हात उगारला. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. 

या सीझन मध्ये 'टिकेल तोच टिकेल'  या टास्कदरम्यान पराग कान्हेरेने रागाच्या भरात घरातील नेहा आणि वैशाली या महिला सदस्यांना धक्काबुक्की केली. तर राग अनावर झाल्याने नेहाच्या चक्क श्रीमुखात भडाकावली.  यामुळे बिग बाॅसने परागवर कठोर कारवाई करत त्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पराग आता घराबाहेर गेल्याच्या जबरदस्त चर्चा रंगल्या आहेत. 

 

परंतु एका आघाडीच्या वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार परागला बिग बॉस घराबाहेर काढणार नाहीत. तर परागला शिक्षा म्हणून बिग बॉस सिक्रेट रूममध्ये ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे पराग बिग बॉसच्या घरातच राहणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनमध्ये राजेश शृंगारपुरेला बिग बॉसने सिक्रेट रूममध्ये राहण्याची शिक्षा ठोठावली होती. या सिक्रेट रुममधे घरातल्या इतर सदस्यांशी अजिबात संबंध येत नाही. त्यामुळे पराग ही शिक्षा कशाप्रकारे भोगणार? आणि झालेल्या सर्व प्रकारावर वीकेंडच्या डावात महेश मांजरेकरांची कोणती प्रतिक्रिया असणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive