By  
on  

बिग बॉस मराठी 2: हिनाच्या नृत्यकौशल्यावर घरातील या सदस्यांचा जळफळाट

हिनाने अगदी काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. पण, सगळेच स्पर्धक तिच्यावर जळफळाट करत आहेत, असं दिसतंय. दमदार नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी हिना केव्हीआरपी ग्रुपला जरा त्रासदायक ठरतेय, असं चित्र आहे.

वूटच्या नव्या 'अनसीन अनदेखा' क्लिपमध्ये हे चार स्पर्धक हिना आणि तिच्या नृत्यकौशल्याबद्दल बोलताना दिसतील.
"तिचं एक कौतुक आहे की, तिने कुठून क्लासेस नाही घेतले, नॅचरली बघून शिकली डान्स" वीणा म्हणाली. ती हिनाच्या डान्सने प्रभावित झालीए बहुधा. परागलाही हे मान्य आहे पण बाकीच्या दोघी (किशोरी आणि रुपाली) कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत.

वीणाने लगेच बाजू सावरत म्हटले, "सॉरी, नो कौतुक हां! पण जे आहे ते आहे आता." यावर रुपाली म्हणाली, "मी सुद्धा कथ्थक, भरतनाट्यम शिकले नाही आहे पण त्या दिवशी मी नाचले मी." यावर किशोरीनेही दुजोरा देत म्हटले, "मी पण. आणि माझे डान्स नंबर्स सुपर डुपर हिट आहेत, मी काहीही शिकलेली नाही आहे."

"फक्त कथ्थकच नाही मी सगळे फॉर्म्‍स नाचू शकते. ती काय अदा करते त्या सगळ्या येतात मला अॅण्ड आय लव्ह डान्सिंग!" असे म्हणून रुपालीने वीणासाठी परिस्थिती अजूनच अवघड करून ठेवली.
इथे नवा दुष्टावा निर्माण होतोय की हा निव्वळ जळफळाट आहे? तुम्हीच पहा 'अनसीन, अनदेखा' भागात फक्त वूटवर.

Recommended

PeepingMoon Exclusive