By  
on  

बिग बॉस मराठी 2: परागला वाईट वर्तणुक नडली, अखेर घरातून झाली हकालपट्टी

बिग बाॅस मराठी 2' अनेक कारणांनी चर्चेत आहे. शिवानीला बिग बाॅसने घराबाहेर जाण्याचा आदेश देणं, बिचुकलेंना झालेली अटक यामुळे हा सीझन रंगत आला आहे. या सीझन मध्ये 'टिकेल तोच टिकेल' हा टास्क सुरु आहे. या टास्कदरम्यान पराग कान्हेरेने रागाच्या भरात घरातील नेहा आणि वैशाली या महिला सदस्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. यामुळे बिग बाॅसने परागवर कठोर कारवाई करत त्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिला आहे. 

बिग बाॅसच्या घरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन वा समर्थन दिलं जात नाही. यामुळे परागने घरातील महिलांशी केलेल्या दुर्व्यवहारामुळे बिग बाॅसने परागला घरातुन निलंबित होण्याचा आदेश दिला. परंतु तरीही परागला चुकीची एक संधी द्यावी म्हणुन परागसंबंधी निर्णय बिग बाॅसने नेहा आणि वैशालीला घ्यायला सांगीतला. परंतु दोघींनीही परागच्या वागण्यावर परखड शब्दात टिका केली. त्यामुळे या दोघींचं मत विचारात घेऊन बिग बाॅसने अखेर परागला घरातुन निलंबित केले. 

परागवर झालेल्या अशा अनपेक्षित कारवाईमुळे घरातील सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळे बिग बाॅसच्या घरात आणखी कोणत्या नाट्यमय घटना पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive