By  
on  

बिग बॉस मराठी 2: असे होते शिवचे रोडीजमधील दिवस, शेअर केला अनुभव

'बिग बॉस' घरामध्‍ये असलेल्‍या स्‍पर्धकांनी पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या जीवनातील अनुभवांबाबत सांगितले आहे. घरामध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी 'रोडी' म्‍हणून लोकप्रिय असलेला शिव ठाकरे 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये थरारक शोमध्‍ये असण्‍याबाबतच्‍या त्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना दिसत आहे. शिव हिनासोबत गप्‍पागोष्‍टी करत असताना जुन्‍या आठवणींमध्‍ये रमतो. तो म्‍हणतो, ''मी रोडीजमध्‍ये गेलो, ती जर्नी २८ डेजची होती. जेव्‍हा स्‍टार्ट केली तेव्‍हा एकदम बल्‍की होतो आणि जेव्‍हा परत आलो तिथून माझे फ्रेण्‍ड्स एअरपोर्टला रिसीव्‍ह करायला आलेले त्‍यांना मला बघून विश्‍वास नाही झाला की हा मीच आहे एवढा चेंज झालेलो मी फिजिकली.'' 
शो त्‍याच्‍या खडतर टास्‍कसाठी ओळखला जातो.

शोमध्‍ये स्‍पर्धकांसाठी अनेक आव्‍हाने आहेत. शिव त्‍याच्‍या अनुभवाबाबत बोलताना म्‍हणतो, ''तिथे बाहेर टेण्‍ट्समध्‍ये राहायचो आम्‍ही, इथे तरी झोप भेटते वेळेवर, तिथे तर पहाटे ४ वाजता वोट आऊट व्‍हायचं, एव्‍हरी अल्‍टरनेट डे, ज्‍या शूटचा काही वेळ नाही. जर ४ ला झोपलो परत ६ ला उठून टास्‍क परफॉर्म करा.'' हिना शिवच्‍या शोप्रती आवड व समर्पिततेकडे भारावून जात मन लावून त्‍याची कथा ऐकत आहे. 

खरंच शिव, आम्‍ही टास्‍क पूर्ण करण्‍याच्‍या आणि प्रत्‍येकवेळी तुझ्या क्षमतांना वाढवण्‍याच्‍या साहसाचे कौतुक करतो. आशा करतो की, आम्‍हाला 'बिग बॉस' घरामध्‍ये देखील तोच रोडी पाहायला मिळेल! 
तुमच्‍या लाडक्‍या स्‍पर्धकांबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी पाहत राहा 'अनसीन अनदेखा' फक्‍त वूटवर

Recommended

PeepingMoon Exclusive