By  
on  

बिग बाॅस मराठी 2: परागचं बिग बॉसच्या घरात पुनरागमन, जिंकेल का सदस्यांचं मन?

बिग बाॅसच्या घरात 'टिकेल तोच टिकेल' टास्क दरम्यान पराग कान्हेरेने नेहा शितोळे आणि वैशाली माडेला मारहाण, धक्काबुक्की केली. या कृतीचा बिग बाॅसने तीव्र शब्दात निषेध करत परागला घरातुन निलंबित केलं. 

परंतु वीकऐंडच्या डावात आज परागला महेश मांजरेकरांनी आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. तेव्हा परागच्या कृत्याबद्दल मांजरेकरांनी सर्वांना बोलतं केलं. तेव्हा सर्व सदस्यांनी परागवर टिकेची झोड उठवली.

 

या सर्व प्रकरणातुन परागला बिग बाॅसने पुन्हा एक संधी दिली आहे. यामुळे परागचा बिग बाॅसच्या घरात पुन्हा प्रवेश झाला आहे. परागच्या पुन्हा येण्याने घरातले सदस्य त्याच्याशी कसे वागतात? पराग पुन्हा घरातील सदस्यांचं मन जिंकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना बिग बाॅसच्या पुढच्या भागात कळुन येतील.

 

Recommended

PeepingMoon Exclusive