By  
on  

बिग बाॅस मराठी 2: परागचा घरात पुन्हा प्रवेश, पण सदस्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

बिग बाॅसच्या घरात नेहा शितोळे आणि वैशाली माडेला मारहाण केल्याप्रकरणी पराग कान्हेरेला बिग बाॅसने घरातून निलंबित केलं होतं. परंतु वीकएंडच्या डावात मांजरेकरांनी परागला आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. तेव्हा सर्वांनी परागवर टिकेची झोड उठवली. 

तरीही परागला चुक सुधारण्याची एक संधी मिळावी म्हणुन बिग बाॅसने परागला पुन्हा घरात पाठवलं. परागने घरात आल्या आल्या नेहाची गुडघ्यावर बसुन माफी मागीतली. वैशाली मात्र पराग यायच्या आधीच उठुन दुसरीकडे निघुन गेली. परागने घरातील सर्व सदस्यांची माफी मागीतली. पण कोणीही त्याचं ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. 

परागने पुन्हा एकदा नेहाजवळ जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंत नेहाने परागच्या समजावण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर मांजरेकरांनी परागला घरात ठेवायचं की नाही, हा निर्णय घरातील सर्व सदस्यांवर सोपवला. तेव्हा सर्वांनी परागची बाजु न घेता पराग घरात राहण्यास पात्र नाही, हे सांगीतले. 

त्यानंतर सर्वांच्या म्हणण्याचा मान राखत परागला घरातुन बाहेर जावे लागले. तसेच या आठवड्यात नाॅमिनेशन प्रक्रिया झाली नाही. आता बिग बाॅसच्या पुढच्या भागांमध्ये आणखी कोणती वळणं येणार, यासाठी प्रेक्षकांमध्ये कुतुहल आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive