By  
on  

मराठी बिग बॉस2: घरातील सदस्यांचं हे कलागुण तुम्हाला माहीत आहे का?

बिग बॉस मराठीचं घर हे कलाकारांच्या टॅलेन्टने परिपूर्ण असं घर आहे. येथे येणारा प्रत्येक जण स्वतःच्या करियरमध्ये उत्तम कामगिरी करून आलेला आहे. यापैकीच एक नाव म्हणजे किशोरी शहाणे. 


आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे आणि सुंदर अभिनयामुळे किशोरींनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांनी आजवर ७० पेक्षा जास्त मराठी सिनेमांमध्ये काम केलं. परंतु अभिनयासोबत किशोरींकडे इतरही अनेक कलागुण आहेत.

किशोरींनी शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.  किशोरींनी आपलं हे अनोखं नृत्यकौशल्य घरातील इतर सदस्यांसमोर  सादर केलं. वैशाली माडेने किशोरींसाठी 'जिया जले जान जले' हे गाणं गायलं. या गाण्यावर किशोरींनी दिलखेचक अदा करून उपस्थित सदस्यांचं मन जिंकलं. 


किशोरींचा डान्स संपताच सर्व सदस्यांनी टाळ्या वाजून त्यांच्या सुंदर अदाकारीला दाद दिली. बिग बॉसच्या घरातील अशाच अनसीन गोष्टी प्रेक्षकांना VOOT ऍप वर पाहता येतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive