By  
on  

बिग बॉस मराठी 2 : या तीन कलाकारांची नावं वाईल्डकार्ड एंट्रीसाठी चर्चेत, माजी स्पर्धक ऋतुजा धर्माधिकारीचं नाव आघाडीवर

बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन सुरु होऊन आता चार आठवडे झाले आहेत. या चार आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय प्रसंग घडले आहेत. अभिजीत बिचुकलेंना अटक होणं, पराग कान्हेरेला घरातून निलंबित करणं अशा अनेक गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत. 

हिना पांचाळच्या रुपात बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्डकार्ड एंट्री झाली. लवकरच घरात दुसरी वाईल्डकार्ड एंट्री होणार आहे. अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी, अभिनेत्री प्राची पिसाट आणि अभिनेते मिलिंद शिंदे ही तीन नावं वाईल्डकार्ड एंट्रीसाठी चर्चेत आहेत. 

अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी ही मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची सदस्य आहे. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. मिलिंद शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतले खलनायक म्ह्णून लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक मराठी सिनेमांत तसेच मालिकेत खलनायकी छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अभिनेत्री प्राची पिसाटनेसुद्धा 'राधा प्रेम रंगी रंगली', 'नकळत सारे घडले' यांसारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. 

त्यामुळे या तिघांपैकी कोण बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्रीमार्फत प्रवेश करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive