By  
on  

बिग बॉस मराठी 2: सुरेखा पुणेकरांची ही इच्छा घरातील सदस्य पुर्ण करणार का?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क आणि कॅप्टन बनणे याला महत्व खूप आहे, आणि त्यासाठी सदस्य खूप प्रयत्नात असतात. कॅप्टन बनल्यावर त्या तो सदस्य त्या आठवड्यात नॉमिनेशन पासून सेफ होतो. काल बिग बॉसच्या घरामध्ये रंगला कॅप्टनसीचा टास्क. या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण बनणार हे दोन्ही टीमना ठरवायचे होते. आणि त्यासाठी त्यांनी टीम मधून उमेदवार दिले.

कॅप्टनसीसाठी नेहाच्या टीम मधून माधव आणि शिवच्या टीम मधून वीणाचे नावं सदस्यांनी घेतले... यावरून दोन्ही टीममध्ये बरीच चर्चा देखील झाली. अभिजीत केळकरचे म्हणणे पडले मला कॅप्टन बनायला आवडेल. कारण ज्यावेळेस माधवला विचारणा झाली तेंव्हा त्याला व्हायचे नव्हते. पण अभिजीत केळकर एकदा कॅप्टनसीच्या टास्कसाठी खेळला असून आता माधवला संधी देऊ असे सगळे म्हणाले. आणि यावरच सुरेखा पुणेकर यांचे म्हणणे पडले मला पण कॅप्टन व्हायला नक्कीच आवडेल, माझा विचार कधी केला जाईल ? माधव नंतर माझं नावं असलं पाहिजे.

आता बघूया टीम कोणाचं नावं देणार पुढच्या वेळेस.  आज घरामध्ये काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर

Author

Recommended

PeepingMoon Exclusive