By  
on  

बिग बॉस मराठी 2: वैशाली, नेहा या घरच्यांच्या आठवणीने झाल्या भावूक

बिग बॉस मराठी सीझन २ मधील आणखी एका नाट्यमय आणि यशस्वी आठवड्यानंतर या घरातील स्पर्धक आता मात्र त्यांच्या घराची, प्रियजनांची आठवण काढत आहेत. 'अनसीन अनदेखा'च्या नव्या क्लिपमध्ये नेहा शितोळे काहीशी भावुक झालेली दिसते. तिला तिच्या कुटुंबियांची आठवण येतेय. वीकेण्डच्या एपिसोडनंतर नेहा, हीना आणि वैशाली गप्पा मारत असताना नेहाला तिच्या नवऱ्याची, नचिकेत पूर्णपात्रेची आठवण येते. त्याने नेहासाठी अत्यंत भावुक संदेशासह फुलं पाठवली होती. 

तिची काळजी वाटून वैशालीने विचारलं, “काय झालं?” यावर नेहाच्या वतीने हीना म्हणाली, “तिला बोलायचंय नचिकेतबरोबर, फोन वर, ऐकायचाय आवाज.” नेहा अत्यंत भावुक होत म्हणाली, “एकदा फोनवर बोलायचंय.”
वैशालीने तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

ती म्हणाली, “ती नोट बघून ये जा परत एकदा, रडू नकोस. ३ महिन्यांमधून आता फक्त दिड महिना राहिला आहे. बाकी दिड महिना आपण घालवला आहे.” नेहाला पाहून वैशालीलाही तिच्या मुलीची आठवण आली आणि तिच्या वाढदिवशी तरी बोलता यावे, अशी विनंती तिने केली आहे.
नेहा आणि वैशालीच्या इच्छा पूर्ण होतील का?
पहा संपूर्ण क्लिप, फक्त वूटच्या अनसीन अनदेखावर!

Recommended

PeepingMoon Exclusive