By  
on  

बिग बॉस मराठी 2: या माजी स्पर्धकांचं बिग बॉसच्या घरात झालं जंगी स्वागत

बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन यावेळी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. घरात घडणाऱ्या अनेक नाट्यमयी घटनांमुळे या सिजनची रंगत उत्तरोत्तर वाढत चालली आहे. 'बिग बॉस मराठी 2' चा पाचवा आठवडा सध्या सुरु आहे. 

बिग बॉसच्या घरामधले टास्क हे नेहमीच काहीसे वेगळे आणि हटके असतात. असाच एक हटके टास्क स्पर्धकांमध्ये खेळवला जाणार आहे. या टास्कसाठी सर्व सदस्य पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट या पेहरावात घरात वावरताना दिसत आहेत. 

सदस्यांमध्ये हॉटेलशी संबंधित एक टास्क खेळवला जाणार आहे. या टास्कदरम्यान बिग बॉसच्या पहिल्या सिजनधल्या माजी स्पर्धकांचं घरात आगमन होणार आहे. यामध्ये सई लोकूर, पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत, स्मिता गोंदकर हे चार माजी स्पर्धक या टास्कमध्ये भाग घेणार आहेत. पुन्हा एकदा घरात प्रवेश केल्याने या चारही जणांना आनंद झालेला दिसून येतो. 

 

घरातल्या सदस्यांनी या हॉटेलचं नाव 'आईचा विसावा' असं ठेवलं आहे. आता हे माजी स्पर्धक येऊन बिग बॉसच्या घरात कशी धमाल करणार, हे प्रेक्षकांना आजच्या भागात कळून येईल. 

अनेकवेळेस घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्या कलाकारांना कोणाला सुरक्षित करायचं किंवा कोणाला असुरक्षित करायचं यांसारखे विशेष हक्क दिलेले असतात. त्यामुळे या माजी स्पर्धकांना असे काही स्पेशल हक्क बिग बॉसने बहाल केले आहेत का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive