By  
on  

बिग बॉस मराठी2: घरातील सदस्यांनी शेअर केला दुखापतीचा अनुभव

कलाकारांना मालिका किवा चित्रपटांसाठी शूटिंग करताना अनेक आव्‍हानांचा सामना करावा लागतो. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये स्‍पर्धक किशोरी शहाणे सेटवर झालेल्‍या दुखापतीबाबत तिचा अनुभव सांगताना दिसते. पूल भागाजवळ झालेल्‍या 'धर पकड' कॅप्‍टनसी टास्‍कनंतर वीणाच्‍या पायाला सूज आली आहे आणि किशोरी ताई व हिना तिला आराम वाटावा म्‍हणून मदत करताना दिसत आहेत. 

अनेक दुखापती झाल्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना डान्सिंग दिवा हिना म्‍हणते, ''मी एक्‍स्‍परिअन्‍स आहे लागण्‍यामध्‍ये, मला अजूनही मार्क आहे त्‍याचा. बाइकसोबत घसरून पडलेली, पूर्ण स्किन निघालेली पायाची. पण मला पार्टी करायची होती म्‍हणून मी ती पट्टी लावून ४ दिवस गोव्‍याला पार्टी करत होते.'' 

यामधून किशोरीला तिचा ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट 'माहेरची साडी'दरम्‍यान झालेली दुर्घटना आठवते आणि ती म्‍हणते, ''त्‍याच्‍यामध्‍ये एक गाणं होतं ज्‍याच्‍यात डान्‍स करताना शेवटी मी आणि माझ्या मैत्रिणी पाण्‍यात जातो आणि खेळतो. तर त्‍या खेळण्‍यामध्‍ये जेव्‍हा आम्‍ही आत गेलो पाण्‍याच्‍या, मला कळलंच नाही आणि मोठी काच पायाला लागली.''  

 

ती पुढे म्‍हणाली, ''तो क्‍लायमॅक्‍स होता गाण्‍याचा, त्‍यानंतर पॅकअप होतं, मी त्‍याच हालतमध्‍ये गाण्‍याच्‍या मूव्‍हमेण्‍ट्स, गाणं बोलतेय आणि जेव्‍हा 'कट इट, पॅक अप!' असा आवाज आला तेव्‍हा मी जोरात ओरडले आणि पाय वर घेतला.'' खरंच, किशोरी यांच्‍या कामाप्रती समर्पिततेला सलाम!
पहा संपूर्ण क्लिप फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये

Recommended

PeepingMoon Exclusive