By  
on  

बिग बॉस मराठी 2: शर्मिष्ठाचा चष्मा पाण्यात पडला, शिव आणि अभिजीतची शोध मोहीम

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर या माजी स्पर्धकांचं आगमन झालं आहे. यामुळे बिग बॉसच्या घराची रंगत आणखी वाढली आहे. 

सध्या घरात 'अतिथी देवो भव' हा टास्क सध्या सुरु आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना माजी स्पर्धकांची देखभाल करायची आहे. या टास्कदरम्यान शर्मिष्ठा गार्डन एरियात वावरत असताना शर्मिष्ठाचा चष्मा स्विमिंगपूलमध्ये पडला. त्यावेळी शर्मिष्ठाने चष्मा काढण्यास घरातील सदस्यांना सांगितले. 

 

अशावेळी या टास्कमधील दोन्ही टीममधील अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे चष्मा शोधायला पाण्यात उतरले आहेत. अशावेळी कपडे खराब होऊ नयेत म्हणून म्हणून अभिजीत शर्ट काढून पाण्यात उतरला. 'अभिजीत आणि शिवपैकी जो पहिला चष्मा शोधून आणेल त्यांच्या हॉटेलला मी एक स्टार देईन' असं शर्मिष्ठा म्हणताच शिव आणि अभिजीत या दोघांमध्ये चष्मा शोधण्यास चुरस लागत होती. 

तसेच माजी स्पर्धकांनी अभिजीत केळकरला गाणं गायला सांगितलं. परंतु एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीन-चारवेळा त्याच्या गाण्यात माजी स्पर्धकांनी व्यत्यय आणला. त्याचबरोबर नेहा शितोळेच्या एका चुकीमुळे तिच्या टीमला अडगळीच्या खोलीत जाण्याची शिक्षा मिळाली. एकूणच माजी स्पर्धक घरातल्या सदस्यांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत.

माजी स्पर्धकांच्या या वागण्याच्या घरातील सदस्य मान ठेवतात? की यांच्यामध्येच भांडणं होतात? आणि या नव्या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार ? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकेतचं असणार आहे. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive