By  
on  

बिग बॉस मराठी2: घरातील या सदस्यांच्या नात्याला ‘इश्कवाला लव्हची फोडणी'

'बिग बॉस' घरातील या दोन स्‍पर्धकांमध्‍ये प्रेमाचा अंकुर बहरला आहे आणि शिव व वीणा हे दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात गुंग झाले आहेत. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये याचा पुरावा दिसून येत आहे. 
प्रेममय झालेला शिव नेहाला वीणाच्‍या कानातील हृदयाच्‍या आकाराचे इअररिंग्‍ज दाखवण्‍यासाठी 'पहला पहला प्‍यार है' गाणे म्‍हणत वीणाचे केस मागे करताना दिसत आहे.

नेहा विचारते, ''काय पहिला आणि दुसरा दोन्‍ही प्‍यार?'' त्‍यानंतर वीणा स्‍पष्‍ट करते, ''तेच गाणं इथेच चाललेलं, तेच तोंडात राहिलं. ते असं ऑड वाटतं ना पहला पहला प्‍यार. आता पहला प्‍यार असणं जरा नाही बरंच अवघड आहे!''  शिव मध्‍येच बोलतो, ''नाही हा बिग बॉसमधला प्‍यार है!'' नेहा तिची उत्‍सुकता व्‍यक्‍त करत जोडीला विचारते, ''बरं, प्‍यार आहे असं असेप्‍टेड आहे म्‍हणजे आता?'' पण जोडी विरोधात प्रतिसाद देत बोलतात की हे फक्‍त गाणं आहे. नेहा तिथेच थांबत नाही आणि त्‍यांची मस्‍करी करत म्‍हणते की आता प्रेमाची कबूली द्यावीच लागेल!

नेहासोबतच्‍या या संवादामुळे प्रेमीयुगुल शिव आणि वीणा यांच्‍यामधील बिग बॉस घरातील या प्रेमकरणाबाबत त्‍यांच्‍या आई-वडिलांच्‍या प्रतिक्रियेबाबत चर्चा करू लागतात.

पण उत्‍साही वीणा परिस्थितीला टाळत म्‍हणते, ''माझी मम्‍मा घरी गेल्‍यावर मला म्‍हणेल, तुला नॉर्मल फटके खायचे आहेत की बदामाचे फटके खायचे आहेत, तू सांगशील ते? मम्‍मा म्‍हणेल एक मिनिट जरा बस काय चालू आहे आम्‍हाला तरी सांग?'' यावर शिव म्‍हणतो, ''माझी आई तर असा हात घेईल त्‍यावर लिपस्टिकने बदाम काढेल आणि मग मारेल.'' 
खरंच, आम्‍ही या जोडीला त्‍यांचे नाते पुढील पातळीवर घेऊन जाण्‍यासाठी उत्‍सुक आहोत! पहा या प्रेमळ जोडीच्‍या गप्‍पागोष्‍टी फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये!

Recommended

PeepingMoon Exclusive