By  
on  

बिग बॉस मराठी2: घरातील महिलामंडळावर चढलाय कुकिंगचा फीव्हर

'बिग बॉस' घरातील नवीन टास्‍कमधून काही नवीन समीकरणे समोर आली आहेत आणि जुन्‍या स्‍पर्धकांचे देखील स्‍वागत करण्‍यात आले आहे. पण सर्वात जमेची बाजू म्‍हणजे पूर्वीच्‍या पर्वामधील स्‍पर्धक आणि त्‍यांच्‍या विलक्षण वागण्‍यापेक्षा या स्‍पर्धकांनी अधिक समर्पितता दाखवली आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये बिग बॉस घरातील महिला मंडळ टास्‍कदरम्‍यान किचनमध्‍ये त्‍यांना सामना कराव्‍या लागणा-या संघर्षाबाबत चर्चा करताना दिसत आहेत. तसेच त्‍या 'बिग बॉस' कार्यक्रमाला कूकिंग शोमध्‍ये बदलण्‍याची विनंती करताना दिसत आहेत.

अत्‍यंत चिंतित किशोरी म्‍हणते, ''मला तुमच्‍या ग्रुपच्‍या बासुंदीचं टेन्‍शन होतं बस, बीकॉज आमच्‍या ग्रुपचं सगळं अनप्रीपेअर्ड ठेवलेलं तर ते खराब करण्‍याचा प्रश्‍न नाही येतं.'' रूपाली घरामध्‍ये जिलेबी आणि इमरती बनवण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते आणि म्‍हणते, ''मिक्सर असता ना मला तर मी जलेबी आणि इमरती, रबडी बनवली असती. उडदाची डाळ भिजत टाकली असती, मिक्सर दिला असता तर त्‍याचं बॅटर करून इमरली बनवली असती आणि ते सुद्धा मस्‍त तूपात टाकून.''


या गप्‍पागोष्‍टी ऐकून उत्‍साही वैशाली 'बिग बॉस'ला कूकिंग शो सुरू करण्‍याची आणि त्‍याचे शीर्षक 'बिग बॉस- द कूकरी शो' ठेवण्‍याची विनंती करते आणि ती तिच्‍या अवतीभोवती असलेल्‍यांना तिच्‍या या प्रस्‍तावाला पाठिंबा देण्‍यास सांगते.

आम्‍हाला कूकिंग शोबाबत माहित नाही, पण बिग बॉसने घरातील मंडळींना लवकरच काही कूकिंग टास्‍क द्यावा अशी आमची इच्‍छा आहे!

घराच्‍या आत काय घडत आहे याबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'

Author

Recommended

PeepingMoon Exclusive