By  
on  

बिग बाॅस मराठी 2: महेश मांजरेकर या चार सदस्यांना म्हणाले छोट्या मनाचे! जाणुन घ्या

बिग बाॅसच्या घरात काल वीकएंडचा डाव रंगला. या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांनी सदस्यांची शाळा घेतली. 

घरातील सदस्यांचं या आठवड्यातलं 'प्रगतीपुस्तक' करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर होती. यावेळेस घरातील प्रत्येक सदस्याला एकमेकांना गुण द्यायचे होते. 

घरातील प्रत्येक सदस्याने इतरांना गुण दिले. यावेळेस नेहा, वैशाली, माधव आणि अभिजीत या सदस्यांना महेश मांजरेकरांनी प्रगतिपुस्तकात इतरांना कमी गुण देण्याविषयी चांगलेच खडसावले. "इतक्या छोट्या मनाचं नसावं, बघणा-यांना हेच वाटलं की किती कोत्या मनाचे तुम्ही आहात" असा स्पष्ट शब्दांमध्ये मांजरेकरांनी या चौघांचा खरपुस समाचार घेतला. 

 

तसेच योग्य स्पष्टीकरण आणि सदस्यांचं अचुक निरीक्षण केल्याप्रकरणी मांजरेकरांनी शिवची तारीफ केली. त्यानंतर मांजरेकरांनी स्वतः सर्व सदस्यांना गुण दिले. 

आजच्या भागात नाॅमीनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. सुरेखाताई, हिना, वैशाली, रुपाली आणि किशोरी यांच्यामध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आज बिग बाॅसच्या घरातुन कोण बाहेर पडणार, याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive