By  
on  

बिग बाॅस मराठी 2: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बाॅसच्या घराबाहेर

बिग बाॅसच्या घरात वीकएंडचा डाव पार पडला. या आठवड्यात बिग बाॅसच्या घरात किशोरी, वैशाली, हिना, सुरेखाताई आणि रुपाली हे पाचजणं घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नाॅमिनेटेड होते. अखेर यांपैकी लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकरांना घराबाहेर जावे लागले. 

सुरेखाताई या सुरुवातीपासुन घरात त्यांच्या प्रेमळ स्वभावाने सर्वांच्या लाडक्या होत्या. विशेषतः शिव ठाकरेवर त्यांची माया होती. परंतु खुपदा टास्कमध्ये खेळताना सुरेखाताई बावरलेल्या आणि काहीशा गोंधळलेल्या वाटायच्या. 

मागील आठवड्यात जेव्हा त्यांच्यावर संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा ती जबाबदारी त्या नीट सांभाळु शकल्या नाहीत. नेहा आणि परागचा वाद जो टोकाला गेला त्या भांडणांना आणि टास्कदरम्यान झालेल्या भांडणांना त्या आवर घालु शकल्या नाहीत. त्यासाठी महेश मांजरेकरांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सुरेखाताईंना खडसावले. 

परंतु मागील काही दिवसांपासुन सुरेखाताई जास्त आत्मविश्वासाने घरात वावरत होत्या. टास्कमध्ये त्यांचा पुर्ण सहभाग होता. सतत वयावरुन केल्या जात असणा-या टिकाटिप्पणीमुळे त्यांनी घरातल्या सदस्यांना परखडपणे खडे बोल सुनावले. 

सुरेखाताईंचा घरातल्या राजकारणात अजिबात सहभाग नसायचा. त्या सर्वांशी मतभेद न ठेवता मोकळेपणाने वागत होत्या. परंतु आज सुरेखाताईंना घराबाहेर जावे लागले. सुरेखाताईंच्या घराबाहेर जाण्याने घरातील सर्वांनाच आणि विशेषतः शिवला खुप दुःख झाल्याचे दिसुन आले. परंतु 'शो मस्ट गो ऑन' म्हणत सदस्य नव्या आठवड्यासाठी सज्ज झाले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive