By  
on  

बिग बॉस मराठी2: घरातील या सदस्यांनी शेअर केला वर्क डेडिकेशन अनुभव

अभिनय हे सोपे काम नाही. यामध्‍ये लाभ-नुकसान असतेच. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी व रूपाली काहीशी गंभीर चर्चा करताना दिसत आहेत. दोघीही चटके व जखमांचा त्‍यांच्‍या परफॉर्मन्‍सेसवर कधीच परिणाम झाला नाही आणि त्‍यांनी त्‍यांचे काम सुरूच ठेवले याबाबत बोलत आहेत. 

आपल्‍या नुकत्‍याच एका चित्रपटासाठी शूटिंग करताना झालेल्‍या अपघाताबाबत बोलताना किशोरी म्‍हणते, ''मी एका इव्‍हेण्‍टला चाललेले कर्जतला, एक्‍स्‍प्रेस हायवे लागण्‍याआधी मी ब्‍लॅक कॉफी घेतली आणि गाडीत बसले. कार निघाली आणि थोडंसंच पुढे ब्रेक मारला असेल किंवा काही स्‍पीड ब्रेकर असेल त्‍याने त्‍या कॉफी ग्‍लासचा लीड उडाला आणि अक्‍खी कॉफी माझ्या मांडीवर पडली आणि मी भाजले त्‍या गरम कॉफीने.'' ती पुढे बोलली, ''हायवे असल्‍यामुळे कुठे असंच थांबवू पण नाही शकले. मला बघून ड्रायव्‍हर पॅनिक झाला, त्‍याला समजावलं आणि गाडी पुढे एका धाब्‍यावर थांबवली. तिथून आइस घेऊन लावला कारण पुढे इव्‍हेण्‍ट होता. त्‍याला ठिक व्‍हायला २ महिने लागले.''

या घटनेबाबत ऐकल्‍यानंतर रूपाली आपल्‍या अनुभवाच्‍या फ्लॅशबॅकमध्‍ये गेली. तिने देखील तिचा शो 'एका पेक्षा एक'मध्‍ये घडलेल्‍या घटनेबाबत सांगितले. या शोमध्‍ये तिने पाठ भाजलेली असताना देखील परफॉर्म केले. भावूक रूपाली म्‍हणते, ''सकाळी शूट करायची मी, मग रिहर्सल्‍सला जायचे आणि मग खूप दमून घरी जायचे. आणि माझा प्रॉब्‍लेम असा आहे की घरी कितीही वाजता येऊ पण आंघोळ आणि ब्रश केल्‍याशिवाय मी झोपत नाही. त्‍यासाठीच मग मी गीझर ऑन केला आणि अशीच जाऊन पडले बेडवर आणि मला थोडी झोप लागली थकून, मग अचानक जाग आली तर मी आंघोळीला गेली. जसा शॉवर ऑन केला सगळं गरम पाणी माझ्या पाठीवर आणि भाजले मी, सगळं पोळलं होतं.'' ती पुढे म्‍हणते, ''दुस-या दिवशी माझा परफॉर्मन्‍स होता आणि नेमका माझा ब्‍लाऊज कम्‍पलीट सीक्‍वेन्‍सवाला आणि नॉट मारणारा आणि ती नॉट त्‍याच्‍यावरच आली. रात्री तर काही कळलं नाही भाजलं तेव्‍हा पण सकाळी मला कपडेच घालवत नव्‍हते. सगळी स्किन निघाली होती. मी तरी परफॉर्म केला आणि ते झाल्‍यानंतर, मग मेघा होती आमची मेन्‍टॉर तिने सचिन सरना सांगितलं त्‍यांना विश्‍वास नाही बसला. सचिनजी आले आणि त्‍यांनी बघितलं, सचिनजी म्‍हणाले 'क्‍या बात है यार!' अॅप्रीशिएट केलं त्‍यांनी मला.''

आम्‍ही या दोन धाडसी महिलांकडून त्‍यांची अविरत कटिबद्धता व पॅशनमधून प्रेरणा घेत आहोत! पाहा संपूर्ण क्लिप व अधिक, फक्‍त वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

PeepingMoon Exclusive