बिग बॉस मराठी 2: कोण आहे बिग बॉसच्या घरातलं भूत? वाचा सविस्तर

By  
on  

बिग बॉसच्या घरात उत्तरोत्तर रंगत वाढत आहे. शिव आणि वीणाचं प्रेमप्रकरण,  KVR ग्रुप मध्ये पडलेली फूट यांसारखी अनेक प्रकरणांमुळे बिग बॉसच्या घरात प्रत्येक भागात नाट्यमय वळणं येत आहेत.

बिग बॉसच्या या आठवड्यसाठी नवा टास्क रंगणार आहे. “एक डाव भुताचा” हे या टास्कचं नाव आहे. या टास्कचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे. टास्कमध्ये वेळोवेळी वाजणाऱ्या बझरनंतर भूत झालेला सदस्य जर सेफमध्ये होऊ  शकला नाही तर तो सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. आता कोण स्पर्धेत राहणार ? आणि कोण बाद होणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल KVR ग्रुपचे खटके उडतच होते. इतकी चर्चा या ग्रुपमध्ये कसली होते याबद्दल वैशाली, शिव आणि माधव यांच्यामध्ये बातचीत सुरु होती. तर किशोरीताईनी सकाळी झालेल्या प्रकारामुळे कॅमेराकडे आपली खंत व्यक्त केली. माधवने किशोरी शहाणे यांना विचारले सगळे झाले का बरोबर, गैरसमज दूर झाले का ? माधवने केलेल्या विचारपूस बद्दल किशोरीताईंनी रुपालीला येऊन सांगितले तेंव्हा रुपालीचे म्हणणे होते आपल्या ग्रुप मध्ये काय होते आहे, का भांडण होते याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. तर दोघींचे म्हणणे पडले पण आपले तसे नाही, आपण कधीच इतरांच्या ग्रुपमध्ये ढवळाढवळ करत नाही. तर रुपालीने किशोरीताईची माफी मागितली. रुपालीने किशोरी ताईना जी विचारणा झाली की , सगळं नीट आहे ना ग्रुपमध्ये त्याबद्दल वीणाला सांगितले तर वीणा म्हणाली,''मी ग्रुपमध्ये नाहीये, मी वैयक्तिक खेळते आहे जे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी बोलावे''

त्यामुळे बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये चुरस कशी रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share