बिग बॉस मराठी 2: ड्रामा क्वीन शिवानी सुर्वे येतेय बिग बॉसच्या घरात, आता काय रंग दाखवणार?

By  
on  

बिग बॉस मराठी 2 अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. शिवानी सुर्वेचं अचानक जाणं, बिचुकलेंना झालेली अटक, पराग कान्हेरेने घरातल्या सदस्यांना केलेली मारहाण अशा अनेक कारणांमुळे या शो मध्ये अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या आहेत. 

परंतु एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या बातमीनुसार, अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरात पुन्हा कमबॅक करणार आहे. आजारपणाच्या कारणास्तव शिवानी सुर्वेला बिग बॉसने घरातून बाहेर जाण्याची परवानगी दिली होती. परंतु आता तब्येत ठीक झाल्यामुळे शिवानी वीकएंडच्या डावात बिग बॉसच्या घरात परतण्याची दाट शक्यता आहे. 

आता शिवानी सुर्वेची वाईल्डकार्ड एंट्री होऊन ती घरात कायमची राहणार वा पाहुणी म्हणून घरात येणार, हे प्रेक्षकांना बिग बॉस मराठी 2 च्या वीकएंडच्या डावात प्रेक्षकांना कळून येईल. 

Recommended

Loading...
Share