बिग बॉस मराठी2: किशोरी शहाणेंनी शेअर केला मुलाच्या हिमतीचा किस्सा

By  
on  

किशोरी शहाणे पुन्‍हा एकदा निग्रही स्‍पर्धक म्‍हणून पुढे आली आहे आणि कोणताही टास्‍क करताना तिने बरीच ऊर्जा दाखवली आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये तिच्‍या जीवनातील घडामोडींमध्‍ये यावेळी तिने तिच्‍या मुलाबाबत सांगितले. 

किशोरी तिचा मुलगा बॉबी विज बाबत बोलताना म्‍हणते, ''माझा मुलगा बॉबी जेव्‍हा मिस्टर ग्लॅड्रॅग्सला गेला होता ना मागच्‍या वर्षी, तीन महिने खूप वर्कआऊट सगळं करून बॉडी बनवली, सिक्‍स पॅक अॅब्‍स बनवले आणि फायनल्‍सच्‍या दोन ते तीन दिवस आधी त्‍याला थायफॉईड डिटेक्‍ट झाला.'' ५१ वर्षीय अभिनेत्री पुढे म्‍हणते, ''डॉक्‍टरने टोटल बेड रेस्‍ट सांगितलेली आणि तो तरी पुल ऑफ करत होता, त्‍यांनी सांगितलं तू नाही झोपलास तर तू कॉलप्‍स होशील. त्‍याने माझ्याकडे बघितलं, दीपककडे बघितलं आणि म्‍हणाला, 'होईल मी कॉलप्स पण मला जाऊ दे!’.'' 

खडतर काळाची आठवण काढत ती म्‍हणते, ''फायनल महालक्ष्‍मी रेसकोर्सला झालेली, तेव्‍हा अनाऊन्‍समेंट होत असताना वेगवेगळे लुक ऑफ द इअर आणि ऑल भेटत होते सगळ्यांना. पण त्‍याच्‍यात कश्‍यातच बॉबीचं नाव येत नव्‍हतं, रनर्स अप पण अनाऊन्‍स झाले त्‍यातही नाही खूप डिसापॉइण्‍टमेंट झाली आणि जेव्‍हा फर्स्‍ट रनर अप बॉबी विज नाव आला तेव्‍हा खूप खुश झालो आम्‍ही, काटे आले अंगावर माझ्या.'' 

किशोरी मौरीन वाडियाची देखील प्रशंसा करते आणि म्‍हणते, ''त्‍या थायफॉईडमध्‍ये उन्‍हात वॉक करणं, तरी मौरीन वाडिया ज्‍या आहेत त्‍यांनी समजून घेतलं आणि बोलल्‍या त्‍याचं जेव्‍हा वॉक नसेल तेव्‍हा त्‍याला साइडला बसवू आपण. आणि आता तो मोटिव्‍हेशनल स्‍पीचेस देतो कॉलेजेसला जाऊन की सोडायचं नाही शेवटच्‍या रे ऑफ होप पर्यंत नाही सोडायचं!'' शिव आणि अभिजीत दोघेही बॉबीची प्रशंसा करत म्‍हणतात, ''वाह, क्‍या बात है!’ हॅट्स ऑफ!’'' 

खरंच, आपण असं म्‍हटलं पाहिजे जशी आई तसं मूल. त्‍याची कटिबद्धता आणि किशोरीच्‍या मातृत्‍व प्रेमाला सलाम. अशा अनसीन कथा जाणण्‍यासाठी पाहत राहा वूटचा 'अनसीन अनदेखा'.

Recommended

Loading...
Share