बिग बॉस मराठी 2: कोण मारतंय नेहाला जोरजोरात हाक? शिवानी सुर्वे आलीय का बिग बॉसच्या घरात?

By  
on  

'बिग बॉस मराठी 2' सध्या टीआरपी मध्ये अग्रस्थानी आहे.घरातील अनेक नाट्यमयी घटनांमुळे या सिजनची रंगत उत्तरोत्तर वाढली आहे. आज बिग बॉसच्या घरात वीकएंडचा डाव रंगणार असून या डावात महेश मांजरेकर सर्व सदस्यांची शाळा घेणार आहेत. 

तसेच या वीकएंडच्या डावात बिग बॉसच्या घरात एक पाहुणी येणार आहे. घरात प्रवेश करायच्या आधी ही पाहुणी नेहाला तिच्या नावाने जोरजोरात हाक मारते. ''आय लव्ह यू नेहा'' अस म्हणताच ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करून नेहाला कडकडून मिठी मारते. ही पाहुणी दुसरी तिसरी कोणी नसून ड्रामा क्वीन शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरत परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

 

आजारपणाच्या कारणास्तव शिवानी सुर्वेला  बिग बॉसने घराबाहेर जाण्याची परवानगी दिली होती. परंतु आता शिवानी घरात जाण्यासाठी फिट असून या आठवड्यातील वीकएंडच्या डावात शिवानी बिग बॉसच्या घरात परतण्याची दाट शक्यता आहे. शिवानीचं घरातील कमबॅक कोणाला आवडणार? आणि कोणाला खुपणार? हे पाहणं प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचा विषय आहे. 

 

Recommended

Loading...
Share