बिग बॉस मराठी 2: भेटवस्तू देण्यावर किशोरींचा विश्वास नाही, कारण माहितीय का?

By  
on  

कुटुंब व सामाजिक जीवनापासून दूर असलेले बिग बॉस घरातील प्रत्‍येक स्‍पर्धक सर्वात प्रतिष्‍ठीत शीर्षक जिंकण्‍यासाठी त्‍यांच्‍या क्षमतांनुसार सर्वोत्‍तम प्रयत्‍न करत आहे. पण घरातील मंडळींना त्‍यांच्‍या प्रियजनांची खूपच आठवण येत आहे. बिग बॉसच्या घरात एका निवांत क्षणी किशोरी व हिना भेटवस्‍तूंबाबत चर्चा करताना दिसत आहेत. 

आकर्षक हिना वापरत असलेले परफ्यूम भेट म्‍हणून देण्‍यासाठी तिच्‍या मैत्रिणीचे आभार मानताना दिसत आहे. हे ऐकून किशोरी घरातील एक टास्‍क पूर्ण करताना तिने गमावलेल्‍या परफ्यूमबाबत निराशा व्‍यक्‍त करत म्‍हणते, ''माझा आता बर्थडे होऊन गेला ना २३ एप्रिलला तेव्‍हा बॉबीने मला छान परफ्यूम गिफ्ट केलं होतं इथे युज करण्‍यासाठी पण गेलं ते 'चोर बाजार' टास्‍कमध्‍ये, खूप पॉइण्‍ट्स मागत होते त्‍याचे. किती तरी इम्‍पॉर्टण्‍ट सामान गेलं. हा ऑफ कोर्स नंतर भेटेल पण या प्रवासात नाही ते!'' 

यामधून हिनाला घर सोडल्‍यानंतर तिच्‍या मैत्रिणींना द्याव्‍या लागणा-या ट्रीटबाबत आणि तिच्‍या कुटुंबाला गोव्‍याला घेऊन जाण्‍याचे वचन आठवते. किशोरी प्रतिक्रिया देत म्‍हणते, ''मला ना अॅक्‍च्‍युअली काय वाटतं माहित आहे, गिफ्ट्स दिल्‍याच नाही पाहिजेत, असंच एन्‍जॉय केलं पाहिजे, गेट टूगेदर केलं पाहिजे. नाही तर गिव्‍ह अॅण्‍ड टेक चालु राहतं आणि ते हॅस्‍सल राहतं डोक्‍यामध्‍ये. भेटा हे गिफ्ट असतं अॅक्‍च्‍युअली, शेअरिंग, केअरिंग, विशिंग हे सगळे गिफ्ट असतं!'' असे किशोरी म्‍हणते.  

यावरूनच कळून येतं की किशोरी आपले विचार अगदी परखडपणे मांडते. बिग बॉसमधील अशाच कधीही न पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला VOOT ऍपवर पाहायला मिळतील. 

Recommended

Loading...
Share