बिग बॉस मराठी2: नेहाची ही सवय आहे तिच्यासाठी अडचणीचं कारण

By  
on  

बिग बॉसच्या मागील आठवड्यात बिग बॉसनी सदस्यांचं लक्झरी बजेट काढून घेऊन त्यांना शिक्षा सुनावली होती. त्यामुळे मर्यादित सामानात भागवताना सदस्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. वूट्च्या अनसीन अनदेखामध्ये मात्र नेहाला याचा फायदा झालेला दिसत आहे. नेहा वीणाला म्हणते, हा टी शर्ट मोठा होतोय म्हणजेच काहीतरी बदल झालेला दिसतोय. पण झालेला बदल चांगलाच आहे’. यावर वीणा नेहाला बेली फॅट घटवण्याचा सल्ला देते.

यावर नेहा सहमत होत म्हणते, त्यासाठीच चाललं आहे सगळं. मी भूक आवरू शकत नाही. त्यापुढे बोलते, मी इथे येण्यापूर्वी सगळं म्हणजे आंबे, मासे आणि आवडतात त्या सगळ्या गोष्टी खावून तृप्त होऊन आले आहे. हे सगळं यासाठी की 2-3 महिने या सगळ्याची आठवण यायला नको. यावर नेहा तिला सांगते की, तिने गेला पूर्ण सीझन एकही आंबा खाल्ला नाहीये. यावर दोघीही त्यांच्या आंबाप्रेमावर चर्चा करतात. आम्ही अशी आशा करतो की, बिग बॉस त्यांना लवकरच मेजवानी देतील. अशा अनसीन कथा जाणण्‍यासाठी पाहत राहा वूटचा 'अनसीन अनदेखा'.

Recommended

Loading...
Share