बिग बॉस मराठी2: नेहा शितोळेला का वाटतं सैफ आहे खरा नवाब

By  
on  

सेलिब्रिटी असो वा कॉमन मॅन प्रत्येजण कुणाना कुणापासून इम्प्रेस असतो. नेहा शितोळेदेखील सैफ अली खानच्या अदबशीर वागण्यामुळे इम्प्रेस झाली आहे. नेहाने सेक्रेड गेम्स या वेबसिरीजच्या पहिल्या भागात काम केलं आहे. त्यामुळे तिला प्रसिद्धी देखील मिळाली. या सिरीजमध्ये तिच्यासोबत नवाब सैफ अली खानही होता.

 

यावेळी नेहाने सैफसोबतच्या कामाचा अनुभव शेअर केला आहे. नेहा म्हणते, ‘सैफ खरा नवाब आहे. त्याची अदब, बोलणं सगळंच कसं पद्धतशीर आहे. तो समोरच्या मुलीला अगदी प्रिसेंस सारखं वागवतो.’ यावेळी एका सीनवेळी सैफने तिची घेतलेली काळजी याबद्दलही तिने एक किस्सा यावेळी सदस्यांशी शेअर केला. यावेळी तिने तैमुरचा किस्साही शेअर केला. सुपरस्टार असूनही सैफ तैमुरच्या बाबतीत एका सर्वसामान्य वडिलांइतकाच हळवा आहे. हे देखील तिने शेअर केलं.

Recommended

Loading...
Share