बिग बॉस मराठी 2: शिवानीने वीणाला घेतलं फैलावर , 'त्या' वक्तव्याबद्दल मागितलं स्पष्टीकरण

By  
on  

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात अखेर  शिवानीने कमबॅक केलं आहे. शिवानीच्या या कमबॅकमुळे अभिजीत, नेहाला आनंद झाला. तर शिवानी येताच वीणा, रुपाली खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करत होते. यावरूनच शिवानी येताच काही सदस्यांना आनंद झाला तर काही सदस्यांना तिचं हे कमबॅक खुपलेलं स्पष्ट दिसत होतं. 

शिवानीने आल्या आल्या वीणाला चांगलेच फैलावर घेतले. शिवानी जेव्हा घरात होती तेव्हा वीणा, शिवानी आणि पराग कान्हेरेखूप मतभेद  मतभेद होते. एकदा पराग आणि वीणा बोलत असताना वीणा आणि परागमध्ये शिवानीबद्दल चर्चा सुरु होती. यावेळी ‘आता मी हिला नादी लावतो’, असं पराग वीणाला म्हणाला होता. त्यावर ‘हो ती आहेच तशी’, असं उत्तर वीणाने परागला दिलं होतं. वीणाच्या याच वक्तव्यावर शिवानीने तिला जाब विचारला. ''तशी आहे, म्हणजे नक्की कशी आहे?'' असा प्रश्न शिवानी वीणाला विचारला. यावर वीणाने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि वीणाची भंबेरी उडाली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve) on

यावरुनच शिवानीने आल्या आल्याच स्वतःचं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. शिवानीच्या येण्यामुळे गेले काही दिवस वीणाचा  घरात जो उद्धटपणा, आगाऊपणा चालू आहे त्याला निश्चितच चाप बसेल, अशी खात्री आहे. तसेच शिवनीच्या येण्याने घरात आता  आणखी कोणता नवा ड्रामा रंगणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचा विषय आहे. 

 

Recommended

Loading...
Share