बिग बॉस मराठी2: पेपर विक्रेता ते बिग बॉसचं घर असा होता शिवचा संघर्ष

By  
on  

बिग बॉसचे घर हे असे ठिकाण आहे, जेथे स्‍पर्धक सर्व संकोच मागे सारत त्‍यांच्‍या जीवनगाथांबाबत खुल्‍या मनाने सांगतात. मोठे स्‍टारडम मिळवलेला स्‍पर्धक शिव ठाकरेची अशीच एक कथा आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये हा स्‍वावलंबी तरुण हिना व वैशाली यांना त्‍याच्‍या जीवनातील संघर्षांबाबत सांगताना दिसत आहे.

 

हिना शिवला प्रश्‍न विचारते, ''लाइफमध्‍ये तू काय संघर्ष केला आहेस स्‍वत:साठी?'' तो म्‍हणतो, ''हो केला आहे मी पण, मला तो संघर्ष वाटला नाही, मी एन्‍जॉय केला आहे तो टाइम पण. मला आता काही जरी भेटलं ना तरी खाली झोप तेवढीच चांगली लागेल जेवढी ५ स्‍टार हॉटेलच्‍या बेडवर लागेल, मला दोन्‍हीकडे मज्‍जा वेगळी येते.''

 

येथून शिवचा भावनिक प्रवास सुरू होतो, जेथे तो बालपणींचा आठवणींना उजाळा देत म्‍हणतो, ''आमचं घर कौलाचं होतं छान, त्‍याच घरात किचन, तिथेच सगळं काही. पाणी गळायचं कौलातून. आई भांडं पकडून बसून राहायची पाणी पडतेय तिथे की मी ओला नाही झालो पाहिजे. मग हळूहळू सगळं ठिक झालं, मी दुधाचे पॅकेट्स वाटायचो मी न्‍यूजपेपर वाटायचो. फटाक्‍याचे दुकान लावायचो, खूप पैसे भेटायचे त्‍यातले आईला द्यायचो बाकीचे नवीन कपडे घ्‍यायचो.'' हिना व वैशाली ही कथा ऐकून स्‍तब्‍ध होतात आणि त्‍या जीवनातील त्‍याच्‍या पुढील प्रवासाबाबत विचारतात. तो पुढे सांगतो, ''नंतर मग मी डान्‍स करायला लागलो, परफॉर्म करायला लागलो. मला शाळेत वगैरे शिकवायला बोलायचे त्‍यात ७५ रूपये भेटायचे. मग हळूहळू ५०० रूपये झाले, मग १००० रूपये, ५००० रूपये, १०,००० रूपये, मग ७५,००० रूपये भेटून जायचे १५ डेजमध्‍ये. लोकांना आवडू लागलं माझं टिचिंग, मग मी इंजीनिअरिंगला गेलो सगळं छान झालं. आता ड्युप्‍लेक्‍स घेतला छान, ताई, मी आणि आई आम्‍ही तिघांनी मिळून. पप्‍पांचं ऑपरेशन झालं आहे तर त्‍यांना नाही त्रास देत आम्‍ही.''

खरंच, आम्‍ही शिवला यशासाठी शुभेच्‍छा देतो आणि आशा करतो की, त्‍याची ही कथा त्‍याचे सर्व चाहते व फॉलोअर्सना प्रेरित करेल. तोपर्यंत पहा तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकाचे अनकट व्‍हर्जन फक्‍त वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

Loading...
Share