बिग बॉस मराठी 2: गुगलवर सुद्धा शिवानी सुर्वेचीच चर्चा, महेश मांजरेकरांपेक्षा ठरली सरस

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात शिवानीच्या कमबॅकची जोरदार चर्चा होती. अखेर वीकएंडच्या डावात शिवानीचं पाहुणी म्हणून घरात आगमन झालं. आणि पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घराची रंगत वाढली. 

 आजारपणाचं कारण देत शिवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली पण तिच्या चाहत्यांना हे फार खटकलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती घरात आली आहे आणि गुगलवर गेल्या आठवड्याभरातील शिवानीचा सर्च वाढला आहे. इतकंच नव्हे तर सर्चच्या बाबतीत शिवानीने ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनाही मागे टाकलं आहे.

‘गुगल ट्रेण्ड्स’चा आढावा घेतला तर गेल्या सात दिवसांत म्हणजेच जेव्हापासून शिवानीच्या परतण्याची चर्चा सुरू झाल्या आहेत तेव्हापासून गुगलवर तिचा सर्च वाढल्याचं दिसत आहे. ९ जून ते १५ जून दरम्यान हा सर्च सर्वाधिक होता.

 

आश्चर्याची बाब म्हणजे, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, आंध्रप्रदेश या दक्षिणेकडील  राज्यांमध्ये तिचा सर्च जास्त आहे. यावरूनच संपूर्ण भारतात शिवानीची लोकप्रियता किती शिगेला पोहोचली आहे याचा प्रत्यय येतो. आता शिवनीच्या परतण्याने बिग बॉस मराठीच्या घरात कोणता ड्रामा रंगणार हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे. 

Recommended

Loading...
Share