बिग बॉस मराठी2: घरातील या ‘दबंग गर्ल’ने असा केला ट्रोलिंगचा सामना

By  
on  

जेव्‍हा बघावं तेव्‍हा आपल्‍याला कलाकारांची त्‍यांच्‍या कपड्यापासून ते ट्विट्स आणि त्‍यांनी साकारलेल्‍या पात्रांपर्यंत विविध कारणांसाठी टिका (ट्रोल) झालेली ऐकायला मिळते. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये बिग बॉस घरातील माजी-स्‍पर्धक व नवीन पाहुणी शिवानी सुर्वे हिना पांचाळला होणा-या टिकांबाबत (ट्रोल बाबत) मुक्‍तपणे मत सांगताना दिसत आहे. 

शिवानीने बिग बॉस घराबाहेर होणा-या टिकांना (ट्रोल) यशस्‍वीपणे हाताळले होते. हे समजल्‍यानंतर हिना तिच्‍या धाडसी वृत्‍तीची प्रशंसा करत चिंता व्‍यक्‍त करत म्‍हणते, ''खूप स्‍ट्राँग आहेस तू. मी स्‍वत: असा विचार करतेय की बाहेर आल्‍यावर काय होणार! कोण काही करणार नाही पण आपले जे फॅन्‍स असतात ते कसे रिअॅक्‍ट करणार!''  निश्चिंतपणे शिवानी म्‍हणते, ''हे जे बोलतात, ट्रोल करतात, ती मुलं कोण असतात! ११वी, १२वीची मुलं, ज्‍यांच्‍या आईबाबांना कळलं ना की हे असे पोस्‍ट आणि कमेंट टाकतात, ढुंगणावरती २ फटके देतील त्‍यांच्‍या!'' ती पुढे म्‍हणते, ''मला ना ते बॉदरच नाही करत. मला माझ्यासाठी माझ्यापेक्षा इम्‍पॉर्टण्‍ट कोणीच नाही आहे. आय लव्‍ह मायसेल्‍फ, मोअर दॅन एनीथिंग एल्‍स ऑन धिस प्‍लॅनेट. आय नो हाऊ टू कीप मायसेल्‍फ हॅप्‍पी. आय नो मला स्‍वत:ला प्रायोरिटीवर ठेवून कशा गोष्‍टी करायच्‍या आहेत. मला फक्‍त माझ्यासोबत माझी फॅमिली आणि अजिंक्‍य लागतो बस्‍स.'' 

 

हे ऐकल्‍यानंतर हिना देखील प्रांजळपणे रिअॅलिटी शोमध्‍ये असण्‍याने होणा-या टिकेबाबत (ट्रोल बाबत) तिची भिती व्‍यक्‍त करते. भावूक होत शिवानी तिचे अश्रू पुसत म्‍हणते, ''माझं करिअर काय एवढं मोठा नाही आहे पण मी जे काय केलं आहे ना त्‍यात मी खूप प्राऊड आहे आणि आय थिंक व्‍हॉटेव्‍हर कम्‍स इन माय लाइफ, प्रोफेशनच्‍या संदर्भात दॅट इज पार्ट ऑफ माय लाइफ. तो माझ्या आयुष्‍याचा एक भाग आहे, ते माझं आयुष्‍य नाही आहे. दॅट मेक्‍स व्‍हेरी इजी फॉर मी टू डील विथ इट!'' आम्‍ही फक्‍त एवढेच सांगू शकतो की, धाडसी मुलींनो टिका (ट्रोल) करणा-यांचा तुम्‍ही तुमच्‍या कामगिरीवर परिणाम होऊ देऊ नका. पहा असे अनेक 'अनसीन अनदेखा' ड्रामा फक्‍त वूटवर!

Recommended

Loading...
Share