बिग बॉस मराठी 2 : 'रेगे' फेम आरोह वेलेणकरची बिग बॉसमध्ये होणार दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री ?

By  
on  

सध्या बिग बॉस मराठी 2 चं घर अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलं आहे. क्षणार्धात कधी काय घडेल याचा काहीच नेम नाही. घरात सध्या मर्डर मिस्ट्री टास्क रंगला असतानाच आता ह्या विकेंडला घरात नवा सदस्य शिरकाव करण्याची दाट शक्यता आहे.  रेगे या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश करणारा हॅण्डसम हंक अभिनेता आरोह वेलणकर हा बिग बॉस मराठीची दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री  असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने दिली आहे.

अभिनेत्री हीना पांचाळ ही बिग बॉस मराठी 2 ची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होती तर मागच्याच आठवड्यात अभिनेत्री शिवानी सुर्वे ने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, मात्र यावेळेस ती सदस्य नसून फक्त पाहुणीच असेल. आरोहचं कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी खास कनेक्सशन आहे. त्यांच्याच  रेगे सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने 'हॉस्टेल डेज' हा सिनेमा आणि 'व्हाय सो गंभीर' या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. प्रेम हे या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरसुध्दा पदार्पण केलं. 

 

अभिनेता आरोह वेलणकर हा सिनेसृष्टीतल्य़ा तरुण फळीपैकी एक आहे. तो बिग बॉसच्या आजच्या म्हणजेच 20 ऑगस्टच्या विकेंडच्या डाव भागात घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेईल. त्यामुळेच आता आरोहच्या येण्याने घरातलं वातावरण हलकं फुलकं होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share