बिग बॉस मराठी 2: घरात येण्यापूर्वी सद्स्यांनी अशी केली तयारी

By  
on  

 
बिग बॉस घरामध्‍ये असलेले सर्व स्‍पर्धक आपल्‍या भावना व ब-याच गोष्‍टी शेअर करताना दिसतात. पण आपल्‍या कुटुंबांच्‍याबाबतीत ते भावूक होऊन जातात. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिवानी रूपालीला तिच्‍या आईची प्रतिक्रया सांगत आहे. तसेच बिग बॉस मराठीसाठी निवड झाल्‍यानंतरच्‍या तिच्‍या कुटुंबाच्‍या प्रतिक्रियेबाबत विचारताना दिसत आहे. 

उत्‍सुक शिवानी रूपालीला विचारते, ''तुझं किती दिवस आधी डीसाईड झालं होतं इथे यायचं?'' रूपाली म्‍हणते, ''एक वीक जेमतेम, एकच वीक मिळाला मला. त्‍यात १० वेळा सगळ्या मीटिंग आणि १० वेळा सगळ्या गोष्‍टी आणि परत फॅमिलीला ३ दिवस आधी कळलं की हो.'' 
रूपाली त्‍यानंतर तिच्‍या आई-वडिलांच्‍या प्रतिक्रियेबाबत सांगत म्‍हणते, ''अगं आईबाबांना ३ दिवस आधी सांगितलं कारण कन्‍फर्मच होईना काही. काय करायचं काय करायचं चाललं होतं.'' रूपाली पुढे म्‍हणते, ''आई बाबा असे की कधी कळलं? कधी गेलीस तू मीटिंगला? कधी या सगळ्या गोष्‍टी झाल्‍या? बट आई बाबा एक्‍सायटेड होते, सुपर एक्‍सायटेड!'' 

यामुळे शिवानी तिच्‍या आईची प्रतिक्रिया सांगू लागते आणि याबाबत तिच्‍या आईची प्रतिक्रिया किती वेगळी होती ते सांगते, ''माझ्या आईला प्रत्‍येक मीटिंग कुठे, कधी, किती वाजता, काय बोलणे झाले, हे सगळं सांगावं लागतं.'' ती नंतर तिच्‍या आईचे अनुकरण करत म्‍हणते, ''मग किती वाजता पोहचलीस गं. किती वेळ लागला? ट्रॅफिक होतं का? नाही ते आले होते का? की तू पहिली गेलीस? तिथून सुरुवात असते.'' 
आपण फक्‍त एवढेच म्‍हणू शकतो की, आई खरंच खूप काळजी करतात आणि शिवानी अत्‍यंत नशीबवान आहे. 
घरातील असे अनकट फूटेज पाहण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'

Recommended

Loading...
Share