बिग बाॅस मराठी 2: राजकारण आले अंगाशी, गायिका वैशाली म्हाडे बिग बाॅसच्या घराबाहेर

By  
on  

बिग बाॅसच्या घरात वीकएंडच्या डावात आज नाॅमिनेशन प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत बिग बाॅसच्या गोड गळ्याची गायिका वैशाली म्हाडेला घराबाहेर जावे लागले. 

वैशाली सुरुवातीपासुनच शांत राहुन स्वतःचा गेम खेळत होती. परंतु गटबाजी करणं, आणि आपला ग्रुप सोडुन बाकीच्यांना कमी लेखणं यात वैशाली अव्वल होती. खुपवेळेस ती पडद्याआडुन घरातील राजकारणाला प्रोत्साहन द्यायची. 

तिचं वीणासोबत आणि सुरेखाताईंसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्या भांडणात वैशालीचा स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा सर्वांना दिसुन आला. परंतु अनेकदा ती तिच्या गोड गायनाने घरात माहोल निर्माण करायची हेही तितकंच खरं. 

वैशालीच्या जाण्याने अभिजीत आणि शिव या तिच्या ग्रुपमधल्या सदस्यांना खुप दुःख झालेले पाहायला मिळत होते. वैशालीच्या जाण्यानंतर आता घरात कोणत्या नाट्यमय घटना पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share