By  
on  

बिग बॉस मराठी 2: म्हणून शिव आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं झालं होतं ब्रेकअप

बिग बॉसच्‍या स्‍पर्धकांसाठी प्रत्‍येक 'वीकेंडचा डाव' अनोखा ठरत आहे. माधव देवचके बिग बॉसच्‍या घरातून बाहेर पडला आहे आणि शिव 'परफॉर्मर ऑफ द वीक' ठरला आहे. शिव हिना पांचाळसोबत आपल्‍या आधीच्या गर्लफ्रेंडच्या प्रेमासंदर्भात बोलताना दिसणार आहे.

दोघे स्‍पर्धक सलमान खान आणि करिश्‍मा कपूरचे 'दुल्‍हन हम ले जायेंगे' चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'रुठना मनाना है प्‍यार की अदा, कैसे जियूंगा मै तुझसे होके जुदा' गात असतात. आणि तितक्‍यात शिव आपल्‍या एक्‍स-गर्लफ्रेंडबद्दल सांगू लागतो, ''मला खूप आवडतं हे साँग. मी माझ्या एक्‍स-गर्लफ्रेंडला मनवायचो या गाण्‍याने. तिला खूप आवडायचं, म्‍हणून थोड्या वेळ आधी गायलो मी हे गाणं आणि एकदम चूप झालो विचार करुन की तिला हर्ट होईल, ती पहात असलेच मला. मी खूप ट्रू होती, छान होती ती.'' 

नंतर शिव त्‍यांच्‍या ब्रेकअपसाठी स्‍वत:लाच दोष देत म्‍हणाला, ''तिला हे साँग एवढं आवडायचं की तिला कुठे ह्याचे थोडेसे जरी लिरिक्‍स दिसले की मला दाखवायला यायची. आम्‍ही ९ इयर्स होतो एकत्र. मी पूर्ण गाणं नाही गायचो, मी इथूनच गायचो 'तू जो कहेगी मै वैसा करुंगा, तेरी हरेक जिद को पूरा करुंगा.' खूप छान होती ती, पण माझीच चूक होती आणि मी गमावलं तिला.''

''कशात तुमच्‍या रिलेशनमध्‍ये? काय केलंस तू? आणि आताच ब्रेकअप झालं का तुमचं?'' असे हिनाने उत्‍सुकतेने विचारल्‍यावर शिव म्‍हणतो, ''लग्‍नाचं होतं यार! मी कमिटमेंट नव्‍हती दिली तिला लग्‍नाची. तिला माहित होतं की मी थोडा करियर ओरिएन्‍टेड आहे. काही ६-७ महिन्‍यांआधी तुटलं. तिला खूप आवडायचो मी. मग मला पण ती आवडायची. खूप केअर करायची ती, माझे प्रॅक्टिकल, माझं जेवण, तिला माझी आवड-निवड माहित होती सगळी. तिच्‍या घरी लग्‍नाचं सुरु होतं आणि तिचं म्‍हणणं होतं की आताच कर लग्‍न. आणि मी सेटल्‍ड नव्‍हतो. आता मी काय एकटा आहे जे आवडलं ते घेतो, लग्‍नानंतर घरी असेल कोणी माझी जबाबदारी. पण तिची चूक नव्‍हती मी तयार नव्‍हतो.'' 

हिनाने नंतर त्‍याला समजवायचा प्रयत्‍न केला की, त्‍यांनी आपल्‍या नात्‍याला आणखी एक संधी द्यायला हवी. पण शिवने त्‍याची एक्‍स आता तिच्‍या आयुष्‍यात पुढे गेली आहे असे सांगून तिचे म्‍हणणे खोडून काढले. आपल्‍याला माहित नाही की, ही मुलगी नक्‍की कोण आहे. पण आशा करुया की, शिवला त्‍याचे खरे प्रेम लवकरच मिळेल! बिग बॉसच्या घरातील अशाच न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना VOOT ऍप वर पाहायला मिळतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive