By  
on  

बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणेंच्या मुलाने घरातील सदस्यांना केलं भावनिक आवाहन

बिग बॉसच्या घरात सदस्यांसाठी नेहमी काहीतरी सरप्राईज असतं. नेहमी टास्कमध्ये व्यस्त असणारे स्पर्धक आज मात्र थोडे इमोशनल होणार आहेत. आज घरात फॅमिली वीक सुरु होणार आहे. या वीकमध्ये सदस्यांच्या घरातील व्यक्ती त्यांना भेटायला येणार आहे. यावेळी किशोरी ताईंचा मुलगा बॉबी विज त्यांना भेटायला आला आहे. यावेळी बॉबीने सगळ्यांना किशोरीताईंशी आदराने वागण्याचं आवाहन केलं आहे.

 

बॉबी म्हणतो, ‘ किशोरी शहाणे विज हे बाहेर खुप मोठं आणि अनुभवी नाव आहे. ज्यावेळी तुम्ही त्यांना टारगेट करता, त्यांच्याविषयी नकारात्मक बोलता त्यावेळी त्यांना किती वाईट वाटत असेल विचार करा. 35 वर्षांच्या अनुभवानंतर ज्यावेळी आपण चेष्टेचा विषय बनतो त्यावेळी खुप वाईट वाटतं. त्यामुळे तिच्या अनुभवाचा सर्वांनी आदर करणं गरजेचं आहे.’ बॉबी बोलत असताना किशोरी ताई स्टॅच्यु होत्या. पण त्या भावनिक झाल्याचं त्यांच्या हावभावावरून कळत होतं. आता या फॅमिली वीक मध्ये इतर स्पर्धकांना कोण कोण भेटायला येणार आणि हा फॅमिली वीक कसा रंगणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive