By  
on  

बिग बॉस मराठी 2: आरोह वेलणकरचं आहे हे सगळ्यात मोठं स्वप्न

बिग बॉस घराला १० आठवड्यानंतर नवीन कर्णधार अभिजीत केळकर मिळाला. त्‍याने प्रतिस्‍पर्धी आरोह वेलणकरचा पराभव केला. कॅप्‍टन्‍सी टास्‍कच्‍या सर्व दबावानंतर घरातील मंडळी आता आराम करत आहेत आणि एकमेकांशी गप्‍पागोष्‍टी करत आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आरोह त्‍याच्‍या वडिलांबाबत सांगताना दिसत आहे.

आरोह त्‍याच्‍या वडिलांचे गाणे गाण्‍यास सुरूवात करतो. अभिजीत त्‍याबाबत विचारतो. उत्‍साहित होत नेहा बोलते, ''त्‍याच्‍या बाबांनी चाल लावलेलं आणि कम्‍पोज केलेलं गाणं आहे हे, त्‍यामुळे तो म्‍हणतोय!'' याबाबत त्‍याच्‍या अवतीभोवती असलेले सर्वजण (शिवानी, शिव, अभिजीत आणि नेहा) गाण्‍याची प्रशंसा करत म्‍हणतात, ''नाइस साँग!''

शिव विचारतो, ''बरं ऐकना तुझे पप्‍पा कोण आहेत?'' आरोह सांगतो, ''माझे बाबा हे खूप वर्ष गाणं शिकले, त्‍याची एक छोटीशी स्‍टोरी आहे तुम्‍हाला सांगायला आवडेल मला की माझ्या आजीने माझ्या बाबाला खूप ढकललं तो १७ वर्ष माले निरजुरकरांकडे शिकला, त्‍यानंतर आम्‍ही पुण्‍याला शिफ्ट झाल्‍यानंतर ५ वर्ष ही वॉज द ओन्‍ली स्‍टुडण्‍ट ज्‍याला वॉलंटरिली पंडित जितेंद्र अभिषेकने अॅक्‍सेप्‍ट केलं, कारण वसंतराव राजुरकरांनी रिक्‍वेस्‍ट केली की हा माझा स्‍टुडण्‍ट आहे हैद्राबादवरनं तो येतोय त्‍याचा गाणं बंद नका होऊ देऊ. तर २२ वर्ष प्रॉपर गाणं शिकला आहे बाबा, शो वगैरे पण करायचा मग जेव्‍हा माझ्या भावाचा जन्‍म झाल्‍यानंतर हळूहळू संगीतापासून दूर गेला.''

आरोह त्‍याचे स्‍वप्‍न सांगतो, ''माझं एक स्‍वप्‍न आहे. आता करण्‍टली त्‍यांच्‍याकडनं काहीच होत नाही. तंबुरा, तबला, माळ्यावर एक तंबुरा आहे सगळं शोपीस म्‍हणून ठेवलं आहे घरात. जेव्‍हा त्‍यांची साठी येईल.'' तो पुढे म्‍हणतो, ''त्‍यांना कधीच मी हे सांगितलं नाही आहे. तर माझी अशी इच्‍छा आहे की, त्‍यांनी पोस्‍ट रिटायरमेंट त्‍यांनी फुल टाइम गाणं सुरू करावं आणि त्‍याचं भारतातलं जे ही टॉप मोस्‍ट व्‍हेन्‍यू आहे ना तिकडे मला त्‍यांचं कॉन्‍सर्ट करायचं आहे. मग कोणी येवो न येवो फरक नाही पडतं, मी ऑडियन्‍समध्‍ये बसून बाबाचं गाणं ऐकेन, असं एक माझं थोडासं स्‍वप्‍न आहे!''

आरोह आमच्‍यातर्फे तुला आणि तुझ्या वडिलांना शुभेच्‍छा. पाहा 'अनसीन अनदेखा' क्षण फक्‍त वूटवर!

Recommended

PeepingMoon Exclusive