By  
on  

बिग बॉस मराठी 2: शिवचा चेहरा झाला एवढासा जेव्हा आई म्हणाली,'वीणाला ताई म्हण!'

बिग बॉस मराठी 2 च्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. यामध्ये घरातील सदस्यांच्या कुटुंबातील एक सदस्य त्यांना भेटायला आले आहेत. कालच्या भागात शिवानीचे बाबा, नेहाचा नवरा आले होते. तसेच हिनाच्या वडिलांनी हीनासाठी ऑडिओ संदेश पाठवला होता. 

आजच्या भागात सुद्धा सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातले येणार आहेत. यामध्ये शिवची आई आज शिवला भेटायला येणार आहे. शिवची आई आल्यानंतर सर्व सदस्यांना शिवचं त्याच्या आईसोबतचं असलेलं खोडकर आणि प्रेमळ नातं पाहायला मिळालं. शिवाची आई म्हणाली.''किशोरीताईंना ताई म्हणतोस, मग घरातल्या बाकीच्या मुलींना पण ताई म्हण'' आई असं म्हणताच घरातील सर्व सदस्य हसायला लागले आणि शिवचा चेहरा एवढासा झाला आहे. 

या फॅमिली वीक मध्ये अजून कोणाच्या घरचे सदस्य भेटायला येणार, हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे. टास्क मध्ये डोकं लढवणारे स्पर्धक कुटुंबियांची भेट झाल्याने थोडे इमोशनल झाले  आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive