By  
on  

बिग बॉस मराठी 2: शिवने शेअर केले त्याचे शो संपल्यानंतरचे प्लॅन्स

बिग बॉस १०व्‍या आठवड्यामध्‍ये प्रवेश करत असून स्‍पर्धकांसाठी आनंदमय सरप्राईजेज घेऊन येत आहे. विजेत्‍याचे नाव घोषित करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आलेल्‍या बिग बॉसने स्‍पर्धकांच्‍या कुटुंबाला आमंत्रित करत त्‍यांच्‍यासोबत वेळ व्‍यतित करण्‍याची संधी त्‍यांना दिली. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव, वीणा व अभिजीत केळकर हे तिघे घरामध्‍ये आराम करताना आणि मजेशीर गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहेत. शिव शोच्‍या फिनालेनंतर त्‍याच्‍या गुप्‍त योजनांबाबत सांगतो. 

शिव आनंदाने वीणाला त्‍याच्‍या मनगटावरील टॅटू नाव दाखवतो आणि कॅमे-याकडे बघून सेल्‍फी काढायला सांगतो. अभिजीत त्‍याची प्रशंसा करत म्‍हणतो, ''चांगला दिसतो टॅटू, फॉण्‍ट पण मस्‍तय, छान दिसतो!''  वीणा अभिजीतच्‍या मताशी होकार देत म्‍हणते, ''मला आवडतात टॅटू पण असं होतं ना शूटला प्रॉब्‍लेम होतो, ह्याचाच केवढा त्रास होतो'' आणि ती शूटिंगदरम्‍यान स्‍वत:च्‍या टॅटूबाबत तिला येणा-या समस्‍यांबाबत सांगते. ती म्‍हणते, ''मेकअप बेस लावावा लागतो त्‍याला लपवण्‍यासाठी आणि मग २ ते ३ वेळा दिसला आहे सीनमध्‍ये. एकदा डायरेक्‍टर सरांनी मला बोलवलं आणि म्‍हणाले वीणा मेकअप करतेस ना मग ते जरा इथेही करत जा ना, तेव्‍हा त्‍यांना सांगितलं मी की सर मी करते पण ते निघून जातं बेस, ती साडी नीट करताना, त्‍यावर पल्‍लू असतो ना.'' 

तसेच ती त्‍याला शूटिंगदरम्‍यानच्‍या तिच्‍या अुनभवांबाबत सांगताना जुन्‍या आठवणींमध्‍ये रमत म्‍हणते, ''पण मज्‍जा यायची रे राधा करताना. इट इज वेरी क्‍लोज टू माय हार्ट. यापुढे कितीही प्रोजेक्‍ट झाले तरी राधाचा एक वेगळं स्‍थान असेलच आणि स्‍पेशली कलर्स मराठी. आय अॅम रिअली प्राऊड!'' तिचा अनुभव ऐकल्‍यानंतर शिव शो संपल्‍यानंतरच्‍या त्‍याच्‍या योजनांबाबत सांगतो, ''माझीही शूट चालू होणार आहे शो झाल्‍याबरोबर, मूव्‍ही आहे!'' अभिजीत व वीणा शूटिंगसाठी त्‍याच्‍या उपलब्‍धतेच्‍या बाबतीत प्रश्‍न विचारत शिवची थट्टामस्‍करी करू लागतात. शिव प्रत्‍युत्‍तर देतो, ''मिसकॉलवर पोचून जाणार मी जिथे पोचायचंय!'' याबाबत अभिजीत विचारतो, ''तिचं आणि माझं काय?'' आणि शिव त्‍याला सांगतो, ''तुझ्या मॅसेजवर फक्‍त!'' वीणा विलक्षण प्रश्‍न विचारत शिवची मस्‍करी करत राहते. पण बिचारा शिव न डावलता दोघांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे देतो.  

आम्‍हाला शोनंतर त्‍यांची मैत्री एका प्रबळ नात्‍यामध्‍ये बदललेली पाहायला आवडेल! पाहा असे मजेशीर क्षण वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

PeepingMoon Exclusive