By  
on  

बिग बॉस मराठी 2: अशी सुरु झाली शिवानी अजिंक्यची लव्हस्टोरी

     'बिग बॉस मराठी २'ची स्‍पर्धक शिवानी सुर्वे तिच्‍या बहिरूपी स्‍वभावासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. बिग बॉस घरामध्‍ये तिच्‍या पुनरागमनाने निश्चितच उत्‍साह वाढला आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिवानी किेशोरी शहाणेला तिच्‍या प्रेमाबाबत सांगताना दिसत आहे.

उत्‍साहाने शिवानी म्‍हणते, ''आय वील टेल यू अजिंक्‍य माझ्या प्रेमात कसा पडला फॉर द फर्स्‍ट टाइम!” ती पुढे म्‍हणते, ''मी ना शूटिंगमध्‍ये होती, ती सिरीयल संपायला आली होती आणि मी चालली होती माझ्या एका फ्रेण्‍डला भेटायला. सो अजिंक्‍य मला बोलला, अरे तू जातेयस ना तर माझ्यासाठी एक ब्‍लॅक कॉफी आणं मी म्‍हणाले ओके फाइन आणते मी. तर मी माझ्या फ्रेण्‍डला भेटले, आम्‍ही गप्‍पा मारल्‍या आणि मी एक कॉफी घेतली त्‍याच्‍यासाठी आणि विसरले की मी त्‍याच्‍यासाठी घेतली कॉफी आणि मस्‍त अर्धी पिऊन संपवून टाकली.''

शिवानी पुढे बोलते, ''देन आय रीअलाइज्‍ड आणि म्‍हटलं आता काय करायचं. मग मी सेटच्‍या इथे स्‍पॉट दादांच्‍या इ‍थे गेली, त्‍यांच्‍याकडून कॉफी घेतली आणि त्‍या कॉफीमध्‍ये मिक्‍स केली आणि त्‍याला जाऊन बोलले बघ गरम गरम कॉफी आणली आहे मी तुझ्यासाठी आता खालून परत री-हिट करून आणली. देन ही वॉज लाइक थँक यू सो मच फॉर इट. पण त्‍याला काय माहित मी खाली काय करून आली आहे, त्‍याला वाटलं ती स्‍टारबक्‍सची कॉफी आहे आणि होती ती तो १ रूपयावाल्‍या पाऊचची.''  किशोरी मोठमोठ्याने हसते. शिवानी पुढे ती कशी अजिंक्‍यला प्रन्क्स करून सतावतेय या बाबत सांगताना म्हणते, ''तो म्‍हणतो २५ वर्षांनंतर मुहूर्त लागला असेल तुझ्या जन्‍माचा. तुझ्या सारखी तूच पैदा झाली आहे. मी त्‍याच्‍यासोबत खूप प्रँक्‍स करते, खूप! एकदा मी त्‍याचे आयब्रोज केले होते, वॅक्सिंग पण केलेलं, झोपला होता तो तर सगळं लावून ठेवलं मग नंतर काढावं तर ते लागणारच ना!''

आम्‍ही आशा करतो की, त्‍यांची जोडी नेहमीच एकत्र व सुखी राहो! तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकाबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'.

Recommended

PeepingMoon Exclusive