By  
on  

बिग बॉस मराठी 2: सलमान खानने अभिजित बिचुकलेंना दिला हा सल्ला

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात आज बाॅलिवुडचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान आज विकएंडच्या डावात सर्व स्पर्धकांना भेटायला येणार आहे. सलमान खानची एन्ट्री झाल्यामुळे सर्व स्पर्धक खुश झाले आहेत. त्यामुळे आजच्या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांसह सलमान खान सर्व स्पर्धकांची शाळा घेणार आहे. 

घरात टाॅयलेट साफ न करण्याचा पवित्रा घेतलेल्या बिचुकलेंवर सलमान खानने निशाणा साधला. सलमान खानने बिचुकलेंना टाॅयलेट साफ करण्याचा सल्ला दिला. सलमान म्हणाला, "मी माझ्या घरातलं टाॅयलेट स्वतः साफ करतो. तर तुम्हाला काय अडचण आहे. एवढे तुम्ही जे केस वाढवुन ठेवलेत त्याचा ब्रश करुन टाॅयलेट साफ करा." अशा मिश्किल शब्दांमध्ये सलमानने बिचुकलेंची मस्करी केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Are you excited guys!

A post shared by BIG BOSS MARATHI SEASON 2 (@big_boss_marathi_season_2) on

सलमान खान आल्यावर डान्स तर झालाच पाहीजे. 'गाणं ओळखायचं आणि डान्स करायचा' असा एक टास्क सलमानने सदस्यांना दिला. या टास्कमध्ये सर्व सदस्यांनी मजा-मस्ती करत डान्स केला. सलमाननेही सर्वांच्या नृत्यकौशल्याचं कौतुक केलं. सलमान खानच्या उपस्थितीत घरात अजुन कोणती धमाल रंगणार हे प्रेक्षकांना आजच्या बिग बाॅसच्या भागात पाहायला मिळेल

Recommended

PeepingMoon Exclusive