बिग बाॅस मराठी 2: बिचुकलेंचा डान्स पाहुन भाईजानने दिली बिचुकलेंना ही ऑफर

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात आज बाॅलिवुडमधचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान आज विकएंडच्या डावात सर्व स्पर्धकांना भेटायला येणार आहे. सलमान खानची एन्ट्री झाल्यामुळे सर्व स्पर्धक आज खुश झाले आहेत. त्यामुळे आजच्या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांसह सलमान खान सर्व स्पर्धकांची शाळा घेणार आहे. 

त्यानंतर बिचुकले आणि हिनाने 'देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार' या गाण्यावर डान्स केला. बिचुकलेंच्या हटके डान्सला सलमानने सुद्धा दाद दिली. डान्स झाल्यानंतर सलमान म्हणाला, "मे इन्हे यहा से निकालके सिधा बिग बाॅस हिंदी मे लेकर जाउंगा" 

तत्पुर्वी घरात टाॅयलेट साफ न करण्याचा पवित्रा घेतलेल्या बिचुकलेंवर सलमान खानने निशाणा साधला. सलमान खानने बिचुकलेंना टाॅयलेट साफ करण्याचा सल्ला दिला. सलमान म्हणाला, "मी माझ्या घरातलं टाॅयलेट स्वतः साफ करतो. तर तुम्हाला काय अडचण आहे. एवढे तुम्ही जे केस वाढवुन ठेवलेत त्याचा ब्रश करुन टाॅयलेट साफ करा." अशा मिश्किल शब्दांमध्ये सलमानने बिचुकलेंची मस्करी केली. 

सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या एकत्रित सुत्रसंचालनाने बिग बाॅसमधील वीकएंडच्या डावाला आज वेगळीच रंगत आली आहे.

Recommended

Loading...
Share