By  
on  

बिग बाॅस मराठी 2: अभिजीत केळकर बिग बाॅसच्या घराबाहेर

आज बिग बाॅसमध्ये वीकएंडचा डाव पार पडला. या वीकएंडच्या डावात सलमान खानची विशेष उपस्थिती होती. आज एलिनेशन प्रक्रिया पार पडली. यामध्ये अभिजीत केळकरला घराबाहेर जावे लागले.

घरात सुरुवातीपासुन अभिजीत केळकर स्ट्राँग स्पर्धक होता. अभिजीत प्रत्येक टास्कमध्ये नेहमीच सर्वांपेक्षा वरचढ होता. अभिजीत-शिव-वैशालीची मैत्री घरात नेहमी चर्चेत होती. तिघांचाही ग्रुप घरात शेवटपर्यंत टिकुन होता. तिघंही एकमेकांसोबत प्रामाणिक होतं. 

परंतु तरीही घरात भांडणं लावण्यात अभिजीतचं नाव नेहमी पुढे यायचं. शिवच्या भरवश्यावर अभिजीत खेळतो, असा त्याच्यावर नेहमी आरोप व्हायचा. तसेच मागच्या आठवड्यात एका टास्कदरम्यान अभिजीत बेडखाली लपुन बसला होता. त्यामुळे यावेळी अभिजीत केळकरला  वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांनी खुप झापलं. 

 

अखेरीस आज बिग बाॅसमधुन अभिजीत केळकरला घराबाहेर जावं लागलं. यावेळी निरोप देताना शिव ओक्साबोक्शी रडत होता. आरोहने सुद्धा अभिजीत केळकरला स्ट्राँग स्पर्धक संबोधुन रडला.

तत्पुर्वी सलमान खानने आजच्या वीकएंडच्या डावात येऊन सर्व सदस्यांसोबत धमाल केली. अखेर आज अभिजीत केळकरच्या रुपात आणखी एक स्पर्धक घराबाहेर पडला. आता यापुढे घरात आणखी कोणती रंगत येणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive