By  
on  

बिग बॉस मराठी 2: जेव्हा सलमान चोर पकडतो तेव्हा....

रविवारची रात्र बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी आणि सदस्यांसाठी संस्मरणीय ठरला. कारण रविवारी घरात आला होता खुद्द भाईजान सलमान खान. यावेळी महेश मांजरेकरांनी सलमानशी खुप गप्पा मारल्या. यावेळी सलमानने घरी झालेल्या चोरीचा किस्सा सगळ्यांशी शेअर केला. सलमानच्या घरातील एका सदस्याचा वाढदिवस होता.

त्यादिवशीच्या पार्टीनंतर सर्वजण झोपले असता घरात चोर शिरल्याचं सलमानच्या लक्षात आलं. त्याने अरबाजलाही उठवलं. त्यानंतर या दोघांनी मिळून चोराला पकडलं. या चोराजवळील वॉकमन आणि पैसेही काढून घेतले. पण चोराचे पाच रुपये मात्र त्याला परत केले.  चोर पहिल्यांदाच चोरी करत असल्याचे त्याने सलमानला सांगितले. त्यामुळे सलमान त्याला पोलिसांच्या तावडीत न देता समजावून सोडून देतो. हाच चोर सलमानला काही वर्षांनंतर भेटतो त्यावेळी त्याने चोरी करणं सोडून दिल्याचं सलमानला सांगितलं. सलमानच्या या किस्स्याने तिथं असलेल्या प्रत्येकाचं मनोरंजन मात्र झालं.

Recommended

PeepingMoon Exclusive