बिग बॉस मराठी 2: अखेर शिवचं हे स्वप्न झालं पूर्ण

By  
on  

सलमान खानने उपस्थित राहून शोची शोभा वाढवल्‍याने स्‍पर्धकांचे स्‍वप्‍न सत्‍यात अवतरले. सलमान खान नुकतेच 'वीकेण्‍डचा डाव' एपिसोडमध्‍ये उपस्थित होता. तसेच वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव ठाकरे वीणा जगतापला बिग बॉसमध्‍ये स्‍पर्धक म्‍हणून असण्‍याच्‍या त्‍याच्‍या स्‍वप्‍नाबाबत सांगताना दिसत आहे. 
शिव उत्‍साहित होऊन सांगतो, ''मला ना रात्री स्‍वप्‍नात पूर्ण तेच दिसलं बिग बॉसचा फिनाले, ती एव्‍ही. इथे ५ बसलो होतो आपण सोफ्यावर.'' 

वीणा विचारते, ''कोण ५?'' आणि शिव उत्‍तर देतो, ''४ तर माझ्या डोक्‍यात आहेच. तू, मी, अभी दादा आणि नेहा, पाचवं माहित नाही मला कोण होतं. पण एव्‍ही यार खूप मस्‍त असणार आपला. माझ्या डोक्‍यात काय आहे माहितेय का, ३०च्‍या नंतर सॅटर्डे लागला की ज्‍या कपड्यात आहे त्‍या कपड्यात जाऊन स्विमिंगपूलमध्‍ये जंप मारायची, शूज काढ, माइक काढ आणि सरळ जंप.'' 

शिव पुढे म्‍हणतो, ''तुला माहित आहे ह्या सगळ्या गोष्‍टी ना माझं स्‍वप्‍न होतं. आईला रात्री सतवायचो झोप नाही येत आहे म्‍हणून, कारण माझ्या डोक्‍यात हेच सुरू असायचं की मला इथे यायचं आहे. माझ्या रूममध्‍ये ना बिग बॉस विनर असं लिहिलं आहे, जेव्‍हा मी वर्कआऊट करून येतो आणि पडतो ना बेडवर तेव्‍हा वर एक अलमारी आहे ती दिसते मला त्‍यावर लिहिलं आहे २ वर्ष झाली, अजूनही आहे ते. माहित नव्‍हतं मला की मी ह्या शोमध्‍ये कधी येणार पण बस एवढा विश्‍वास होता की कधी ना कधी तर येणार. इथे जे काही होतंय ते सगळं मी स्‍वप्‍नात बघितलेलं आहे जे मी आता जगतोय!'' 

आम्‍ही आशा करतो की, शिवचे स्‍वप्‍न पूर्ण होवो! पाहा अशाप्रकारचे 'अनसीन अनदेखा' संवाद फक्‍त वूटवर!

Recommended

Loading...
Share