बिग बॉस मराठी 2: आरोह वेलणकरने शेअर केला ‘रेगे’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा

By  
on  

जुन्‍या आठवणींमध्‍ये रमत आरोह म्‍हणतो, ''माझी पहिली फिल्‍म जी केली आहे ना, जी खूप हिट झाली 'रेगे' त्‍या फिल्‍मचा पहिलाच दिवस, त्‍याच्‍या आधी मी फिल्‍म केलीच नव्‍हती, बेसिकली माझ्या आयुष्‍यातला शूटिंगचा पहिला दिवस. सीन असा होता की, मला रिमांडमध्‍ये अंडरवेअरवरती ठेवलं आहे आणि टॉर्चर करतात आहे!'' हे ऐकल्‍यानंतर हिनाला हसू येते, पण तिला त्‍याच्‍यासाठी वाईट देखील वाटते.

 

तो पुढे म्‍हणतो, ''पहिल्‍याच दिवशी मला कॅमे-यासमोर सगळे कपडे काढून, मला कोंबडा करून उभा करतात, मारतात, हे सगळं झालं माझ्याबरोबर पहिल्‍याच दिवशी. अंडरवेअरवर होतो मी, लिटरली व्‍ही शेप प्रॉपर अंडरवेअर तो पूर्ण दिवस!'' हिना अचंबित होऊन चौकशी करते, ''तेव्‍हा तू रिलेशनमध्‍ये होतास ना, लग्‍न झालं नव्‍हतं ना? आणि पुढे काय केलंस, अजून मूव्‍ही?'' आरोह म्‍हणतो, ''लग्‍न माझं आता झालं ११ डिसेंबर २०१७ला, २ वर्ष होतील ह्या डिसेंबरमध्‍ये. ३ मूव्‍हीज केल्‍या आहेत मी, सेकंड कल्‍ट फिल्‍म होती, ज्‍याच्‍यात शिवानी हिरोईन होती माझी.'' 

आरोह त्‍याच्‍या पहिल्‍या चित्रपटानंतर त्‍याच्‍यामध्‍ये झालेल्‍या बदलाबाबत सांगतो आणि पदार्पणासाठी त्‍याला मिळालेल्‍या प्रतिष्ठित पुरस्‍काराबाबत देखील बोलतो. तो म्‍हणतो, ''मी जेव्‍हा मराठी इंडस्‍ट्रीमध्‍ये आलो तेव्‍हा मी बिलकुल गुड लुकिंग नव्‍हतो, खूप सुकडा होतो. कॅरेक्‍टर म्‍हणूनच घेतलं होतं मला रेगेमध्‍ये, ५२ किग्रॅचा होतो मी २०१३ मध्‍ये. त्‍यानंतर मग मी गेन केलं, थोडसं प्रेझेन्‍टेबल दिसावं म्‍हणून. रेगे खूप हिट झालेली, त्‍यावर्षी तीनच हिट फिल्‍म्‍स होत्‍या. एक 'रेगे' होती, एक होती 'लय भारी' आणि एक होती 'टाइमपास'. मला आणि रितेश देशमुखला फिल्‍मफेअरमध्‍ये नॉमिनेशन होतं बेस्‍ट डेब्‍यूट इन मराठी साठी, रितेश जिंकला त्‍यात पण बाकीचे अवॉर्डस् भेटले मला रेगेसाठी 'दादासाहेब फाळके अवॉर्ड' मिळाला अॅज ए डेब्‍यूटण्‍ट २०१५ मध्‍ये. काम चांगलं झालं होतं माझं त्‍यात.'' 

आम्‍हाला बिग बॉस घरातील अशा प्रतिभावान स्‍पर्धकांचा अभिमान वाटतो आणि आम्‍ही आशा करतो की, त्‍यांना अधिकाधिक यश मिळो. वूटवरच्या अनसीन अनदेखामध्ये हा व्हिडीयो आहे.

Recommended

Loading...
Share