By  
on  

बिग बॉस मराठी 2: शिवानी हिनाने शेअर केल्या कुटुंबाच्या आठवणी

 
बिग बॉसच्‍या घरातील सर्व स्‍पर्धकांसाठी त्‍यांचे कुटुंब त्‍यांचा पूर्ण पाठिंबा व भक्‍कम आधार आहेत. हिना पांचाळ आणि शिवानी सुर्वे यांच्‍या कुटुंबांना वाटते की, तुम्‍ही कितीही कमवा, पण तुम्‍ही नेहमीच विनम्र असले पाहिजे आणि तुमचे पाय कायम जमिनीवर असले पाहिजेत. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये हिना आणि शिवानी आपल्‍या कुटुंबाबाबत बोलताना आणि त्‍यांना कशाप्रकारे साधेसरळ जीवन जगायला आवडते त्‍याबद्दल बोलताना दिसणार आहेत.  

''माझी मॉम प्‍युअर व्‍हेजिटेरियन आहे, तिने अंड्याला पण आयुष्‍यात हात नाही लावला आहे, बाकी मी, माझे वडिल, माझा भाऊ आम्‍ही सगळे नॉन-व्‍हेजिटेरियन आहोत. पण आमच्‍या घरातल्‍या लोकांना अजिबात आवडत नाही. माझी आजी आणि आत्‍या पण बोलत असतात नको खाऊस नॉन-व्‍हेज, पण मी नाही ऐकत!'' असे हिना आपल्‍या कुटुंबियांबद्दल सांगते. 

शिवानी हिनाच्‍या ठाण्‍यातील घराबद्दल उत्‍सुकतेने विचारते. हिना तिला सांगते, ''जाते कधी तरी, पण आता मंमी पपा येतात माझ्याकडे. मी दर शनिवारी पपाला बोलवते माझ्याकडे आणि मंमीला खूपच इच्‍छा झाली भेटायची की अॅस्‍ट्रो बरोबर बोलावते, माझा डॉग. मंमी माझी खूप सेव्हिंग्‍ज करणारी आहे, मला भेटायला येते तेव्‍हा नेहमी बोलते एवढं लांब आहे हे, इथे ट्रॅव्‍हल करायला खूप खर्च होतो.'' 

शिवानी देखील आपल्‍या आईवडिलांच्‍या साध्‍या राहणीमानाच्‍या विचारसरणीबाबत सांगते, ''माझे मंमी पपा पण अजून पण ते बसनेच प्रवास करतात! ते नाही रिक्षा किंवा ओला, उबर करतात, म्‍हणजे मी जबरदस्‍ती करुन दिली तरंच, नाहीतर ते लोकल ट्रान्‍सपोर्टच यूज करतात ट्रेन, बस!'' त्‍यावर हिना बोलते, ''माझ्या वडिलांना पण यायचं असतं ना मला भेटायला तर ते काय करतात, बाईक आहे त्‍यांच्‍याकडे पण ते बाईक सोडून ते ट्रेननेच ट्रॅव्‍हल करतात. आधी मुलुंड ते घाटकोपर ट्रेनने, मग घाटकोपरहून मेट्रो घेऊन डीएन नगरला उतरेल आणि मग तिथून चालत घरी येतात भेटायला आणि म्‍हणतात छान एक्‍सरसाईज होते. मी खूप बोलते की पपा तुमची मुलगी कमवतेय आता नका असं ट्रॅव्‍हल करु, पण ते ऐकत नाही बोलतात नाही बेटा आपण जसे आहे ना तसंच रहायचं!'' 

आम्‍हाला तर स्‍पर्धकांच्‍या कुटुंबियांची विचारसरणी खूपच आवडली. स्‍पर्धकांनी आपापल्‍या कुटुंबियांकडून हा नम्रतेचा गुण घ्‍यावा असे आम्‍हाला वाटते. 

Recommended

PeepingMoon Exclusive