बिग बाॅस मराठी 2: शिवानीला चक्कर आली, सदस्यांची घाबरगुंडी झाली

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 हा रिअॅलिटी शो सध्या अखेरच्या टप्प्यावर आहे. सध्या बिग बाॅसच्या घरात पहिल्या पर्वातील सदस्य आले आहेत. 

रक्षाबंधनानिमित्त घरात सर्व आनंदात होते. उत्साहात रक्षाबंधन साजरे झाले. सर्वांनी नवे पारंपरिक कपडे घालुन उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सर्वांसोबत उभी असताना शिवानीला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. 

 

त्यावेळेस किशोरीताईंनी शिवानीला सावरलं. शिवानीच्या अशा अचानक कोसळण्याने घरातले सर्वच सदस्य कावरेबावरे झाले होते. शिवानी अचानक का कोसळली? तिला मेडीकल इमर्जन्सी आलीय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आजच्या भागात मिळतील.

Recommended

Loading...
Share