By  
on  

राष्टपती रामनाथ कोविंदनी लतादीदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच भारतरत्न लता मंगेशकर यांची भेट घेतली. लतादीदींच्या दक्षिण मुंबईमधील निवासस्थानी ही भेट पार पडली. राष्ट्रपती राजभवनातील भुमिगत ‘बंकर म्यूजियम’चं उद्घाटन करण्यासाठी आले होते.

या भेटीसंबंधी राष्ट्रपती लिहितात, ‘ लता मंगेशकर यांच्या मुंबई निवासस्थानी भेट घेऊन प्रसन्न वाटत आहे. त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. लताजींनी त्यांच्या आवाजाने आपल्या अनेकांच्या आयुष्यात गोडवा आणला आहे. त्यांच्यातील साधेपणा आणि त्याग प्रत्येकाला आदर्शभूत ठरवा.’

 

लतादीदींनीही या भेटीचा वृत्तांत सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्या म्हणतात, ‘आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आत्मियतेने घरी येऊन माझी भेट घेतली यामुळे मी स्वत: सन्मानित समजत आहे.’ लतादीदींनी या भेटीचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लतादीदी आता 89 वर्षांच्या आहेत. या भेटीवेळी राष्ट्रपतींसोबत राज्यपाल विद्यासागर राव हे देखील उपस्थित होते.

Recommended

PeepingMoon Exclusive