By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य रमले बालपणीच्या आठवणीत

बालपण हे प्रत्‍येकाच्‍या जीवनाचा सर्वोत्‍तम काळ असतो आणि चांगल्‍या क्षणांची आठवण काढताना नेहमीच आनंद होतो. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले त्‍यांच्‍या बालपणीच्‍या आठवणी आणि बालपणीचे त्‍यांचे खेळ याबाबत बोलताना दिसत आहेत.

बिचुकले म्‍हणतो, ''गेलं ते बालपण, माझा तर क्‍लासच आहे, मी आजपर्यंत मातीमध्‍ये कुठलाही खेळ खेळलो नाही. मला सोडलंच नाही घराच्‍या बाहेर!'' शिवानी आपले बालपण आठवत म्‍हणते, ''मी तर दर २ दिवसांनी ढोपर फोडून यायची लहानपणी. माझा अख्‍खा पाय हा सायलेन्‍सरला चिपकलेला, त्‍यामुळे हा मार्क राहिला आहे!'' 

हे ऐकून किशोरी देखील जुन्‍या आठवणी स्‍मरत म्‍हणते, ''मी पण अशा भरपूर गोष्‍टी केलेल्‍या आहेत. माझा सायकलच्‍या चेनमध्‍ये पाय अडकलेला आहे, स्‍कूटरच्‍या सायलेन्‍सरला चिकटलेला आहे. शिवाजीचा किल्‍ला बांधायचा म्‍हणून गायीच्‍या मागे धावलेले शेण उचलायला बालदी घेऊन!'' शिवानी आणि बिचुकले दोघेही अचंबित होतात. 

बालपणीच्‍या मजेशीर आठवणींना उजाळा देत किशोरी म्‍हणते, ''भरपूर मज्‍जा केली आहे मी, झाडावर चढून आंबे काढले आहेत. मस्‍त बालपण होतं माझं. लगोरी खेळताना हाताला खूप लागलंय माझ्या लहानपणी. ९वीमध्‍ये असताना सायकल शिकले मी आणि सायकल चालवताना जोरात पडले पण होते, पूर्ण हनवटी घासत जमिनीवर, मग त्‍यानंतर चालवलीच नाही सायकल. गरज असली शूटिंगमध्‍ये तरच बसते सायकलवर नाही तर नाही. रिसेन्‍टली अॅटलान्‍टाला चालवली मी सायकल, तिथे एक पार्क आहे त्‍यात सायकल्‍स भेटतात फिरायला.'' 

पाहा तुमच्‍या लाडक्‍या स्‍पर्धकांचे अशी माहित नसलेली तथ्‍यं फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये.

Recommended

PeepingMoon Exclusive