बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्यांना लागलेत शिवानीच्या लग्नाचे वेध

By  
on  

बिग बॉस घरातील बिंदास मुलगी शिवानीचे तिचा प्रियकर अजिंक्‍यसोबत असलेले प्रेम आता गुपित राहिलेले नाही. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये नेहा, आरोह व शिव हे शिवानीला तिच्‍या प्रियकरासोबत लग्‍न करण्‍यासाठी राजी करताना दिसत आहेत. 

उत्‍साही शिवानी म्‍हणते, ''माझी मम्‍मी ना नुसती माझ्या मागेच लागलेली असते, 'शिवानी तुला स्‍थळ आलं आहे ते, त्‍याचा काय करू मी' म्‍हणजे तिला असं म्‍हणायचं असतं नेमकं की तू सांग ना आता तुझं काय चालू आहे ते आणि मी नको नको त्‍या स्‍थळाला आपण नाही म्‍हणूया हेच करत असते!'' यावर आरोह लगेच सल्‍ला देत म्‍हणतो, ''तुझं आता करेक्‍ट एज आहे पण शिवानी लग्‍नाचं! काय म्‍हणतेस नेहा?'
शिवानी प्रत्‍युत्‍तर देत म्‍हणते, ''मला अजून अजिंक्‍यने लग्‍नासाठी प्रपोज केलेलं नाही आहे!'' 

याबाबत नेहा तिच्‍या वयाबाबत चौकशी करत सल्‍ला देते, ''२४ तुला लागेल ना आता! आहे अजून वर्ष, दीड वर्ष. मी माझ्या अनुभवावरून सांगतेय, पंचवीसव्‍या वर्षी लग्‍न केलं प्रॉपर तर नंतरच्‍या गोष्‍टी अॅडजस्‍टमेंटला सोप्‍या जातात, जेवढं उशिरा लग्‍न करशील तेवढं तुला त्‍या घरात किंवा त्‍या माणसांबरोबर अॅडजस्‍ट करायला जमणार नाही!''  

शिवानी तिचा सल्‍ला मान्‍य करत म्‍हणते, ''मी अजिंक्‍यच्‍या मम्‍मी, पप्‍पांबरोबर अॅडजस्‍ट केलेलं आहे खूप चांगलं!'' 
ती पुढे म्‍हणते, ''माझ्या मम्‍मी, पप्‍पांची इच्‍छा आहे की त्‍यांच्‍या २५व्‍या अॅनिव्‍हर्सरीला माझं लग्‍न व्‍हावं! जी आता आहे नोव्‍हेंबरमध्‍ये, सो इट्स नॉट अॅट ऑल पॉसिबल!'' 

आम्‍हाला वाटते की, बिग बॉसचे स्‍पर्धक तर तयारीलाच लागले असतील? अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा 'अनसीन अनदेखा' फक्‍त वूटवर!

Recommended

Loading...
Share