बिग बॉस मराठी 2: किशोरीताईंनी उलगडला अभिनयाचा प्रवास

By  
on  

बिग बॉस घरातील प्रत्‍येक स्‍पर्धकामध्‍ये प्रतिभा ठासून भरलेली आहे. त्‍यांचे संघर्ष व समर्पिततेने त्‍यांना आज ते ज्‍या पदावर आहेत तेथे पोहोचण्‍यामध्‍ये मदत केली आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किेशोरी शहाणे इंडस्‍ट्रीमध्‍ये तिने तिच्‍या करिअरची सुरुवात कशाप्रकारे केली याबाबत सांगताना दिसत आहे.

उत्‍सुक आरोह किशोरीला विचारतो, ''तुमचे बाबा काय करायचे?'' त्‍यावर ती बोलते, ''मॅनेजर होते, तेव्‍हाचे सीईओ म्‍हणता येतील जे बॉस होते त्‍यांचे राइट हँड. २ फॅक्‍टरीजमध्‍ये त्‍यांनी जॉब केला आहे आणि आम्‍ही तिघी मुली आमचं पालनपोषण.'' 

उत्‍सुक आरोह तिच्‍या बहिणीबाबत विचारपूस करतो. किशोरी उत्‍तर देते, ''मी मधली, मला एक मोठी बहिण आहे आणि एक छोटी. अनुराधा, किशोरी आणि वैशाली असे आम्‍ही. वैशाली एअर हॉस्‍टेस आहे आणि मोठी बहिण कॅनडाला असते, तिथे ती स्‍कूल टीचर आहे टॉडलर्ससाठी. फार पेशंसचं काम आहे ते, ह्या वयात टॉडलर्सला सांभाळणं!'' हे ऐकून आरोह व शिवानी अचंबित होतात आणि ते पुढे विचारपूस करतात. 

त्‍यानंतर किशोरी तिने क्षेत्रामध्‍ये सुरू केलेल्‍या तिच्‍या करियरच्‍या जुन्‍या आठवणींना उजाळा देत म्‍हणते, ''आम्‍ही तिघी अशा कर्तबगार निघालो, आपलं आपलं करत गेलो आम्‍ही. ह्या फिल्‍डमध्‍ये योगायोगानेच आली मी. मी ८वि मध्‍ये असताना पेपरमध्‍ये एक अॅड आली होती. 'दुर्गा झाली गौरी' ही नृत्‍यनाटिका बनतेय, त्‍याच्‍यासाठी बालकलाकार हवे आहेत, नृत्‍याची जाण असणारे, शिकले नव्‍हतेच मी, ते मी वाचलं आणि डॅडीला म्‍हटलं की मला जायचं आहे, तर ते मला घेऊन गेले दादरला त्‍याच्‍यासाठी. मग तिथे सिलेक्‍शन झालं माझं, मी आणि वैशाली दोघी गेले होतो, पण तिने काही फॉलो-अप नाही केला. पण मी तिथेच चिकटूनच राहिले, त्‍यांच्‍या ग्रुपला चिकटून राहिले.'' 

ती पुढे म्‍हणते, ''त्‍यांच्‍या पुढे मग स्‍टेट्सची नाटकं केली. हिंदी नाटक वामन केंद्रेने डायरेक्‍ट केलं 'शतुरमुर्ग' मग शिवदास गोडकेने डारेक्‍ट केलं 'महाभोजन तिरव्‍याचे' असं करत, स्‍टेट करता करता मग 'मोरूची मावशी' असे सगळे व्‍यावसायिक नाटकं सुरू झाले करायला. मी ह्या फिल्‍डला चिकटून राहिले, माझी आवड आहे ही!'' 

खरेतर, मराठी इंडस्‍ट्रीला किशोरी सारख्‍या सुंदर प्रतिभावान कलाकाराचा अभिमान आहे! 

Recommended

Loading...
Share